Goa Agriculture: डिचोलीत बळीराजाच्या नजरा आभाळाकडे! भातपीक कणसे धरण्याच्या टप्प्यावर, दमदार पाऊस गायब; हातातोंडाशी आलेला घास करपण्याची भीती

Bicholim Farmers Rainfall Shortage: भातशेती बहरण्याच्या मार्गावर असतानाच पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने येथील बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे.
Bicholim Farmers Rainfall Shortage
Goa AgricultureDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: भातशेती बहरण्याच्या मार्गावर असतानाच पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने येथील बळीराजा चिंताग्रस्त बनला आहे. चतुर्थीनंतर दहा-बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर दोन-तीनवेळा हलक्या सरी बरसल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या; मात्र गेल्या सात-आठ दिवसांपासून दमदार पाऊस न झाल्याने चिंता पुन्हा वाढली आहे.

यंदा मान्सूनच्या सुरुवातीलाच पावसाने ओढ दिल्याने खरीप भातशेती साधारण महिनाभर लांबणीवर पडली होती. त्यानंतर भातशेती चांगली बहरली असून आता कणसे धरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशावेळी पुढील दोन-तीन दिवसांत पोषक पाऊस न पडल्यास भातपीक संकटात येण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे.

Bicholim Farmers Rainfall Shortage
Goa Ujjwala Scheme: उज्ज्वला योजनेचा लाभ 75 हजारांपर्यंत पोहोचला, पण 1 लाख अर्जांचा खोळंबा; नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया लांबण्याची शक्यता

गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असूनही पाऊस मात्र गायब आहे. आता मुबलक पाऊस झाला नाही तर हातातोंडाशी आलेला घास करपून जाण्‍याची भीती आहे.

- विष्णू गिमोणकर, शेतकरी (पिळगाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com