

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट गटातील पहिल्या टप्प्यानंतर आता गोव्याच्या पुरुष संघाचा झोत झटपट क्रिकेटवर असेल. त्यांची सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेतील मोहीम शनिवारपासून (ता. १४) सुरू होईल.
गोव्याचा एलिट ड गटात समावेश असून सामने कोलकता येथे खेळले जातील. गतमोसमातील टी-२० स्पर्धेत गोव्याने सातपैकी चार सामने जिंकले होते, तर तीन सामने गमावले होते. रणजी करंडक स्पर्धेतील अखेरच्या लढतीत बिहारवर डावाने विजय मिळविल्यामुळे गोव्याच्या संघाचा आत्मविश्वास निश्चितच उंचावलेला असून त्याचा फायदा टी-२० स्पर्धेतील बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देताना होऊ शकतो. गोव्याचे एलिट ड गटातील सामने अनुक्रमे विदर्भ (१४ नोव्हेंबर), उत्तराखंड (१६ नोव्हेंबर), मुंबई (१८ नोव्हेंबर), हैदराबाद (२० नोव्हेंबर), ओडिशा (२२ नोव्हेंबर), छत्तीसगड (२४ नोव्हेंबर), गुजरात (२६ नोव्हेंबर) या संघांविरुद्ध होतील.
स्पर्धा टी-२० क्रिकेटमधील असल्याने रणजी संघातील काही खेळाडूंना विश्रांती मिळू शकते, तर आक्रमक शैलीतील अन्य काही खेळाडूंना टी-२० संघात संधी मिळू शकते. त्यामुळे गोव्याच्या टी-२० संघात रणजी चमूत नसलेले चेहरे आल्यास नवल वाटू नये.
टी-२० स्पर्धेतील गोव्याची सर्वोत्तम कामगिरी
२०१३-१४ मध्ये ः ९ सामने, ८ विजय, १ पराभव
दक्षिण विभागात ः ५ सामने, ५ विजय
सुपर लीग फेरी ः ४ सामने, ३ विजय, १ पराभव
मागील पाच मोसमांतील टी-२० स्पर्धेत गोवा
मोसम सामने विजय पराभव
२०२१-२२ ५ २ ३
२०२२-२३ ७ ४ ३
२०२३-२४ ७ ४ ३
२०२४-२५ ६ २ ४
२०२५-२६ ७ ४ ३
गतवेळची कामगिरी
एलिट ब गट
2025-26 मध्ये ः ७ सामने, ४ विजय, ३ पराभव
विजयी विरुद्ध ः चंडीगड (५२ धावांनी), मध्य प्रदेश (७ विकेट्सनी), बिहार (५ विकेट्सनी), जम्मू-काश्मीर (७ विकेट्सनी)
पराभूत विरुद्ध ः उत्तर प्रदेश (६ विकेट्सनी), हैदराबाद (७ विकेट्सनी), महाराष्ट्र (१५ धावांनी)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.