GCA scam investigation
GCA scam investigationDainik Gomantak

GCA: 'कोट्यवधींच्या जीसीए घोटाळ्याची चौकशी 6 महिन्यांत करा'! न्यायालयाने दिले निर्देश; निविदा न काढताच 6.5 कोटींच्या वर्क ऑर्डर्स

GCA scam investigation: असोसिएशनच्या निधीचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करण्यात आला असून, लोढा समितीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
Published on

पणजी : गोवा क्रिकेट असोसिएशनमधील (जीसीए) आर्थिक गैरव्यवहार तसेच नियोजित कट रचून कोट्यवधी रुपयांचा अपहार करण्‍यात आलेल्‍या आरोपांची गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच ‘इन्स्पेक्टर जनरल ऑफ सोसायटीज्’ला‌ ही चौकशी पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे.

‘जीसीए’चे आजीव सदस्य महेश चव्हाण यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने हे निर्देश दिले. असोसिएशनच्या निधीचा वैयक्तिक फायद्यासाठी वापर करण्यात आला असून, लोढा समितीच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकेनुसार, २०२४ आणि २०२५ या कालावधीत जीसीएच्या कारभारात अनेक गंभीर अनियमितता आढळून आल्या. कपडे व किट्स खरेदीसाठी सुमारे १.१२ कोटी रुपये, तर विद्युत कामांसाठी सुमारे ६.५ कोटी रुपयांच्या वर्क ऑर्डर्स कोणतीही खुली निविदा न काढता देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच जीसीएच्या निधीतून खरेदी केलेली बॉलिंग मशीन आणि कॉम्बी केज ही साधने जीसीएच्या मैदानावर न बसवता प्रभारी सचिवांच्या वैयक्तिक क्लबमध्ये बसवण्यात आल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

GCA scam investigation
GCA Sports Project : 'क्रिकेट स्टेडियम अन्यत्र नेल्यास रस्त्यावर उतरू'! आजगावकर यांचा इशारा; GCAने पायाभरणी करण्याची केली मागणी

सचिवांचे पद रिक्त झाल्यानंतर ४५ दिवसांत निवडणूक घेणे बंधनकारक असताना ती न घेता, उपाध्यक्षांना असंवैधानिक पद्धतीने ‘प्रभारी सचिव’ म्हणून नियुक्त करून त्यांना आर्थिक स्वाक्षरीचे अधिकार देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. निविदा प्रक्रिया टाळण्यासाठी मोठ्या रकमांच्या खरेदीचे लहान तुकड्यांत विभाजन करण्यात आल्याचे याचिकेत नमूद आहे, जेणेकरून वरिष्ठ स्तरावरील मंजुरीची आवश्यकता भासू नये.

GCA scam investigation
GCA: 'गोव्यात क्रिकेट विकासासाठी पूर्ण पाठिंबा मिळेल'! CM सावंतांचे ‘जीसीए’ला आश्वासन; नूतन कार्यकारिणीने घेतली भेट

या प्रकरणाबाबत ऑगस्ट २०२५ पासून पोलिस व निबंधकांकडे तक्रारी करूनही कोणतीही कारवाई न झाल्याने याचिकाकर्त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. एजी देविदास पांगम यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणाची सुनावणी २७ फेब्रुवारी २०२६ रोजी निबंधकांपुढे होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com