GCA: 'गोव्यात क्रिकेट विकासासाठी पूर्ण पाठिंबा मिळेल'! CM सावंतांचे ‘जीसीए’ला आश्वासन; नूतन कार्यकारिणीने घेतली भेट

CM Pramod Sawant: राज्यातील क्रिकेटचा विकास आणि प्रगतीसाठी सरकारचा गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीला दिले.
CM Pramod Sawant cricket assurance
CM Pramod Sawant cricket assuranceDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील क्रिकेटचा विकास आणि प्रगतीसाठी सरकारचा गोवा क्रिकेट असोसिएशनला (जीसीए) पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य मिळेल, असे आश्वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संघटनेच्या नूतन कार्यकारिणीला दिले. महेश देसाई यांच्या अध्यक्षतेखालील व्यवस्थापकीय समितीने चेतन देसाई व विनोद (बाळू) फडके यांच्यासमवेत सोमवारी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन क्रिकेटविषयक विविध विषयांवर चर्चा केली.

मागील मंगळवारी झालेल्या जीसीए व्यवस्थापकीय निवडणुकीत चेतन-बाळू गटाने सर्व सहाही जागांवर विजय मिळविताना माजी सचिव रोहन गावस देसाई यांचे समर्थन लाभलेल्या ‘जीसीए परिवर्तन’ गटाचा धुव्वा उडविला होता.

निवडणुकीत परिवर्तन गटाला मुख्यमंत्र्यांचे समर्थन असल्याचा दावा झाला होता. नव्या व्यवस्थापकीय समितीने सोमवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज्यातील क्रिकेटला प्रगतिपथावर नेण्यासाठी त्यांचे आशीर्वाद घेतले. साहजिकच निवडणूक कालावधीतील सारे दावे आता फोल ठरल्याचा निष्कर्ष निघत असल्याचे जाणकार मानतात.

मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेल्या शिष्टमंडळात महेश, चेतन, बाळू यांच्यासह उपाध्यक्ष परेश फडते, सचिव तुळशीदास शेट्ये, संयुक्त सचिव अनंत नाईक, खजिनदार सय्यद अब्दुल माजिद यांचा समावेश होता.

‘‘मुख्यमंत्र्यांसोबतची आमची भेट सकारात्मक ठरली. त्यांनी सरकारचा जीसीएला पूर्ण पाठिंबा जाहीर केला, तसेच आम्हाला सर्वतोपरी साह्य करण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे आमचा हुरुप वाढला आहे. राज्यातील क्रिकेटला अत्युच्च पातळीवर नेण्यासाठी आमची समिती कटिबद्ध आहे,’’ असे अध्यक्ष महेश देसाई यांनी सांगितले.

CM Pramod Sawant cricket assurance
GCA: पुन्हा गोंधळ!'रोहन' यांच्या BCCI प्रतिनिधित्वाला आव्हान; विपुल फडके यांनी दाखल केली याचिका

महेश यांच्या अध्यक्षतेखाली नव्या व्यवस्थापकीय समितीने सोमवारी घटस्थापनेचा मुहूर्त साधून जीसीएच्या पर्वरी येथील मुख्यालयात पदभार स्वीकारला. त्यावेळी मावळत्या समितीचे अध्यक्ष विपुल फडके यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.

CM Pramod Sawant cricket assurance
घटस्थापनेला नवनिर्वाचित समितीकडे पदभार, 'GCA'च्या नव्या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा

स्टेडियम उभारणीला संघटनेचे प्राधान्य

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतल्यानंतर जीसीए अध्यक्ष महेश देसाई यांनी सांगितले, की ‘‘जीसीएच्या नव्या समितीने राज्यात नियोजित असलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या उभारणीला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी आवश्यक सोपस्कार पूर्ण करण्यावर आमचा भर आहे.’’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com