GCA Sports Project : 'क्रिकेट स्टेडियम अन्यत्र नेल्यास रस्त्यावर उतरू'! आजगावकर यांचा इशारा; GCAने पायाभरणी करण्याची केली मागणी

GCA Stadium Foundation Request : बाबू आजगावकर पुढे म्हणाले की, मी क्रीडामंत्री असताना गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार होत्या, त्यासाठी आवश्यक मैदानाची गरज होती.
Dhargalim cricket stadium,  Babu Ajgaonkar
Dhargalim cricket stadium, Babu AjgaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: धारगळ येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सर्व सोपस्कार पूर्ण झाले आहेत त्याच ठिकाणी क्रिकेट स्टेडियम व्हायला हवे. स्टेडियम अन्यत्र नेण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री तथा पेडण्याचे माजी आमदार बाबू आजगावकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला. यावेळी धारगळचे जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर, माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप पटेकर, कृष्णा तळवणेकर उपस्थित होते.

बाबू आजगावकर पुढे म्हणाले की, मी क्रीडामंत्री असताना गोव्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणार होत्या, त्यासाठी आवश्यक मैदानाची गरज होती.

त्या पार्श्वभूमीवर धारगळ येथे क्रीडानगरीसाठी ९ लाख चौरस मीटर जागा घेण्यात आली होती. ही जागा संपादन करताना अनेक अडचणी आल्या. तत्कालीन विरोधकांनी जोरदार विरोध केला. जमीन ताब्यात घेऊनही या ठिकाणी क्रीडा स्पर्धांसाठी मैदान होऊ शकले नाही. त्यानंतर आयुष इस्पितळासाठी ३५ हजार चौरस मीटर

जमीन दिली, तर रवींद्र भवनासाठी १ लाख चौरस मीटर जमीन आरक्षित ठेवण्यात आली. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम व्हावे म्हणून धारगळ व पेडणे मतदारसंघातील ग्रामपंचायतीतर्फे ठराव संमत करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी गोवा क्रिकेट असोसिएशनला २ लाख चौरस मीटर जमीन देण्यात आली. धारगळ ग्रामपंचायत व गोवा क्रिकेट असोसिएशनने एकमेकांना चांगले सहकार्य केले.

या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान व्हावे अशी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही इच्छा होती. त्यानंतरच्या काळात मी निवडणूक हरलो. गोवा क्रिकेट असोसिएशनची समिती बदलली. या काळात येथील क्रिकेट स्टेडियमच्या विषयाला चालना मिळाली नाही. आता येथे होऊ घातलेला हा क्रिकेट स्टेडियम अन्यत्र देण्याचा प्रयत्न चालला आहे.

Dhargalim cricket stadium,  Babu Ajgaonkar
Indoor Stadium Goa: 'डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी स्टेडियम' खाजगी हाती; "निर्णय मागे घ्या, आंदोलन तीव्र होईल" विद्यापीठातील शिक्षकांचा इशारा

‘आमदाराची निष्क्रियता’

माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप पटेकर म्हणाले, की आमदाराच्या निष्क्रियतेमुळे धारगळ येथील क्रिकेट स्टेडियमचा हा विषय पडून राहिला. त्यावेळी जमिनी गेलेल्यांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. त्या युवकांचे वयही आता उलटून गेले आहे.

Dhargalim cricket stadium,  Babu Ajgaonkar
Goa Cricket Stadium: गोव्यात क्रिकेट सामने कधी होणार? 15 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या यजमानपदास वंचित

‘गोवा क्रिकेट असोसिएशनने पायाभरणी करावी’

या क्रिकेट स्टेडियममध्ये स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ही आमची अट आहे. गोवा क्रिकेट असोसिएशनने ताबडतोब येथे मैदानाची पायाभरणी करावी. त्यासाठी धारगळ ग्रामपंचायतीचे सर्व सहकार्य मिळेल.

या ठिकाणी होऊ घातलेले क्रिकेट स्टेडियम अन्यत्र नेण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही गप्प राहणार नाही, असे बाबू आजगावकर म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com