Ranji Trophy: रणजीपूर्वी दर्शन मिसाळची 'दीडशतकी' दणक्यात तयारी; महाराष्ट्राविरुद्ध 152 धावांची चमकदार खेळी

Darshan Misal 152 Runs: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिला सामना आठवडाभरात असताना गोव्याचा अनुभवी अष्टपैलू दर्शन मिसाळच्या फलंदाजीतील आत्मविश्वासाला शनिवारी दीडशतकी बळ लाभले.
Darshan Misal 152 Runs
Ranji TrophyDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील पहिला सामना आठवडाभरात असताना गोव्याचा अनुभवी अष्टपैलू दर्शन मिसाळच्या फलंदाजीतील आत्मविश्वासाला शनिवारी दीडशतकी बळ लाभले. महाराष्ट्राविरुद्धच्या सराव क्रिकेट सामन्यात त्याने १५२ धावांची चमकदार खेळी केली.

गहुंजे-पुणे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर झालेला तीन दिवसीय सामना अनिर्णित राहिला. महाराष्ट्राच्या पहिल्या डावातील ४११ धावांना उत्तर देताना गोव्याच्या पहिल्या डावात ५३ पेनल्टी धावांसह ४०८ धावा जमा झाल्या. दीडशतकी खेळीत डावखुऱ्या दर्शनने २९७ चेंडूंचा सामना करताना १९ चौकार व एक षटकार मारला. तो सर्वांत शेवटी बाद झाला.

Darshan Misal 152 Runs
Goa Vegetable Market: काटेकणगी, करांदे बाजारात दाखल; कमी पावसामुळे कंदमुळे यंदा लवकर, कांदा मात्र 70 रुपयांवर

गोव्याने दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी ४ बाद १५६ धावा केल्या होत्या, तेव्हा दर्शन ४८ धावांवर नाबाद होता. गोव्यासाठी शुक्रवारी दर्शनव्यतिरिक्त ललित यादवने २९, दीपराज गावकरने २४, यश कसवणकरने २५, तर ऋत्विक नाईकने १२ धावा केल्या. अर्जुन तेंडुलकर पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला, तर वासुकी कौशिक तीन धावांवर नाबाद राहिला.

महाराष्ट्रातर्फे राजवर्धन हंगार्गेकर याने ९० धावांत ४ गडी बाद केले, तर प्रदीप दाढे याने ४२ धावांत २ विकेट्स प्राप्त केल्या. महाराष्ट्राविरुद्धचा गोव्याचा पहिला तीन दिवसीय सराव सामनाही अनिर्णित राहिला होता. गोव्याचा संघ आता घरच्या मैदानावर होणाऱ्या पहिल्या रणजी करंडक सामन्यासाठी तयारी करेल.

Darshan Misal 152 Runs
Goa Affordable Housing: सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठं पाऊल; पार्सेत 96,512 चौ. मी. सरकारी जमीन गृहनिर्माण मंडळाकडे

आता उत्सुकता रणजी संघ निवडीची

गोव्याचा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या एलिट अ गटातील पहिला सामना ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत बडोद्याविरुद्ध पणजी जिमखान्यावर खेळला जाईल. भारताचे माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू दिनेश मोंगिया यांच्या मार्गदर्शनाखाली गोव्याने ओमान दौरा, तसेच कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनच्या मोसमपूर्व स्पर्धेत चांगली कामगिरी केली. महाराष्ट्राविरुद्धच्या दोन सराव सामन्यांतही चमक दाखविली, त्यामुळे आता बडोद्याविरुद्धच्या रणजी सामन्यासाठी गोव्याच्या संघ निवडीची उत्सुकता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com