Goa Vegetable Market: काटेकणगी, करांदे बाजारात दाखल; कमी पावसामुळे कंदमुळे यंदा लवकर, कांदा मात्र 70 रुपयांवर

Goa Vegetable Market: काटेकणगी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली नसली तरी काटेकणगीची आवक वाढली आहे.
Goa Vegetable Market
Goa Vegetable MarketDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यात यंदा कमी पावसामुळे काही पिके लवकर बाजारात दाखल झाली आहेत. सर्वसामान्यपणे दसऱ्यानंतर व दिवाळीच्या अगोदर बाजारात दाखल होणारी काटेकणगी, करांदे यंदा दसऱ्यापूर्वीच बाजारात दाखल झाले आहेत. पौष्टिक असलेली काटेकणगी व करांदे २०० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत.

काटेकणगी मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाली नसली तरी काटेकणगीची आवक वाढली आहे. त्यासोबतच अळू माडीही बाजारात दाखल झाली असून, तिला अतिशय चांगली मागणी आहे. अळू माडी प्रतिनग १०० ते १५० रुपयांना विकली जात आहे. आकाराप्रमाणे अळू माडीचे दर आहेत.

Goa Vegetable Market
Goa Affordable Housing: सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न साकारण्याच्या दिशेने मोठं पाऊल; पार्सेत 96,512 चौ. मी. सरकारी जमीन गृहनिर्माण मंडळाकडे

राजधानी पणजी बाजारात काटेकणगी आणि करांदे आदी कंदमुळे अजून सर्वच स्थानिक भाजीविक्रेत्यांकडे उपलब्ध झालेली दिसत नाहीत. काही मोजक्याच महिला ती विकत असल्याने या कंदमुळांना मागणी मोठी आहे. अवघ्या काही मोजक्या जणांकडे काटेकणगी उपलब्ध आहे; परंतु नव्या पिकाची चव चाखण्यासाठी तसेच खतखते करण्यासाठी अनेकजण काटेकणगी, करांदे विकत घेताना दिसतात.

काकडी, चिबूड, दोडकींना मागणी

सध्या बाजारात काटेकणगी, करांदे या कंदमुळांसोबतच काकडी, चिबूड, दोडकी, भेंडी, वाली, फागलां, गावठी वांगी, भाजीची केळी यांनाही चांगली मागणी आहे. मध्यम आकाराचे चिबूड १५० रुपयांना विकले जात आहे. कोवळ्या काकडीचा वाटा ५० रुपये आहे. इतर स्थानिक पावसाळी भाज्यांनाही चांगली मागणी असून, अनेकजण आवर्जून त्या खरेदी करत आहेत. त्यासोबतच बाजारात मोठ्या प्रमाणात वाढलेले कांद्याचे दर कायम असून, पणजी बाजारात ७० रुपये किलो दराने कांदा विकला जात आहे.

Goa Vegetable Market
Goa October Heat: ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच 'हिट'; राज्यात एका दिवसात तापमान 3.4 अंशांनी वाढले, उकाड्याने नागरिक हैराण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com