C K Nayudy Trophy: गोव्याच्या फलंदाजांची हाराकिरी, सर्वबाद 131; गुजरातला निर्णायक आघाडी

Goa Vs Gujarat: चार दिवसीय सामन्याला शनिवारी वलसाड येथील सरदार पटेल स्टेडियमवर सुरवात झाली. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली.
Goa Cricket
Cricket|Clean BowledCanva
Published on
Updated on

C K Nayudy Trophy Goa Vs Gujarat

पणजी: फलंदाजांच्या खराब कामगिरीमुळे गोव्याचा २३ वर्षांखालील क्रिकेट संघ कर्नल सी. के. नायडू करंडक सामन्याच्या पहिल्या दिवशीच ‘बॅकफूट’वर गेला. गुजरातने दिवसअखेर ८० धावांची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली.

चार दिवसीय सामन्याला शनिवारी वलसाड येथील सरदार पटेल स्टेडियमवर सुरवात झाली. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, पण कुशन पटेल (७-३०) याच्या प्रभावी गोलंदाजीमुळे निर्णय अंगलट आला. गोव्याचा पहिला डाव अवघ्या १३१ धावांत गारद झाला. कर्णधार कौशल हट्टंगडी याने सर्वाधिक ३२ धावा केल्या.

Goa Cricket
C K Nayudu Trophy: उत्कंठावर्धक सामन्यात गोव्याची बाजी, जम्मूचा 4 विकेट राखून पराभव; 7 बळींसह मनीषची निर्णायक कामगिरी

गोव्याच्या संघातील फलंदाजी मयूर कानडे चार सामन्यांत तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला. गुजरातने गोव्याच्या मर्यादित माऱ्याचा सहजपणे सामना करताना पहिल्या दिवसअखेर ५ बाद २११ धावा केल्या. यजमान संघाचा सलामी फलंदाज रुद्र पटेल याने शानदार अर्धशतक नोंदविताना ६० धावा केल्या. गोव्यातर्फे यश कसवणकर याने तीन, तर अझान थोटा याने दोन गडी बाद केले.

Goa Cricket
Ranji Trophy 2025: विराट रणजीतही 'फेल'; 15 चेंडूत खेळ खल्लास, बॉलरचा कोहलीसारखाच जल्लोष

संक्षिप्त धावफलक ः गोवा, पहिला डाव ः ४३ षटकांत सर्वबाद १३१ (अझान थोटा १५, देवनकुमार चित्तेम ०, जीवनकुमार चित्तेम १७, कौशल हट्टंगडी ३२, शिवेंद्र भुजबळ २७, यश कसवणकर ८, मयूर कानडे ०, दिशांक मिस्कीन ५, मिहीर गावडे १, लखमेश पावणे ११, मनीष काकोडे नाबाद १, कुशन पटेल ७-३०).

गुजरात, पहिला डाव ः ४७ षटकांत ५ बाद २११ (रुद्र पटेल ६०, प्रियेश ३१, अहान पोद्दार

नाबाद ४१, रुद्र पटेल ३०, आदित्य रावळ नाबाद २७, लखमेश पावणे ३-०-९-०, यश कसवणकर १९-१-९८-३, मनीष काकोडे १०-१-५६-०, अझान थोटा ११-१-२८-२, दिशांक मिस्कीन ३-०-१५-०, मिहीर गावडे १-०-१-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com