
C K Nayudu Trophy Goa Vs Jammu Kashmir
पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेतील यावेळच्या पहिल्या पाच सामन्यांत मनीष काकोडे गोव्याच्या संघात नव्हता, नंतर एकदिवसीय स्पर्धेत तो लक्षवेधक ठरला, आता २२ वर्षीय लेगस्पिनरने चार दिवसीय सामन्यात मॅचविनिंग पुनरागमन करताना दुसऱ्या डावातील सात विकेटसह सामन्यात एकूण दहा गडी टिपण्याची किमया साधली.
मनीषची (३०.४-७-५८-७) दुसऱ्या डावातील भेदक फिरकी, तसेच पहिल्या डावातील अझान थोटा (२४७) याचे द्विशतक या बळावर ब गटातील सामन्यात मंगळवारी गोव्याने जम्मू-काश्मीरला उत्कंठावर्धक अखेरच्या सत्रात चार विकेट राखून हरविले. पहिल्या डावात तीन गडी टिपलेल्या मनीषने सामन्यात १४१ धावांत १० गडी टिपले. सामना सांगे येथील जीसीए मैदानावर झाला.
गोव्यासमोर विजयासाठी १०८ धावांचे आव्हान होते. १ बाद ६२ वरून त्यांची ६ बाद ९० अशी घसरगुंडी उडाली, मात्र नंतर आवश्यक धावा नोंदवत गोव्याने स्पर्धेतील पहिल्या विजयाची नोंद केली. गोव्याला पहिल्या डावात ८९ धावांची आघाडी मिळाली होती. मनीषसमोर नांगी टाकल्याने जम्मू-काश्मीरने नांगी टाकल्यामुळे त्यांचा दुसरा डाव १९६ धावांत संपुष्टात आला.
विजयी कामगिरीसह गोव्याने सामन्यातून १२ गुणांची कमाई केली. यामध्ये फलंदाजीत दोन, गोलंदाजीत चार, तर विजयाच्या सहा गुणांचा समावेश आहे. त्यांचे आता सहा सामन्यांतून ४१ गुण झाले आहेत. जम्मू-काश्मीरला फलंदाजीतील तीन व गोलंदाजीतल एक मिळून चारच गुण मिळाले. स्पर्धेतील तिसऱ्या पराभवामुळे जम्मू-काश्मीरचे सहा सामन्यांतून ४० गुण झाले आहेत. गोव्याचा अखेरचा साखळी सामना १ फेब्रुवारीपासून वलसाड येथे गुजरातविरुद्ध खेळला जाईल.
जम्मू-काश्मीर, पहिला डाव ः ३४७ गोवा, पहिला डाव ः ४३६
जम्मू-काश्मीर, दुसरा डाव (२ बाद ६४ वरून) ः ८०.४ षटकांत सर्वबाद १९६ (काझी जुनेद मासूद ३५, कवलप्रीत सिंग ४२, यश कसवणकर २५-३-६६-२, लखमेश पावणे ११-०२९-१, मनीष काकोडे ३०.४-७-५८-७, शदाब खान ११-१-२३-०, संप्रभ फळदेसाई ३-०-१२-०).
गोवा, दुसरा डाव ः २७.१ षटकांत ६ बाद ११२ (अझान थोटा १६, देवनकुमार चित्तेम ३१, शिवेंद्र भुजबळ २६, कौशल हट्टंगडी २, यश कसवणकर ५, आयुष वेर्लेकर नाबाद ८, मयूर कानडे ०, लखमेश पावणे नाबाद १३, मुजताबा युसूफ ३-४२, सर्वाशिष सिंग २-१९).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.