

पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात दुबळ्या मेघालयाविरुद्ध गोव्याची बिकट स्थिती असताना यष्टिरक्षक-फलंदाज शिवेंद्र भुजबळ याने धडाकेबाज फलंदाजी केली. त्याचे द्विशतक पाच धावांनी हुकले; पण गोव्याला पहिल्या डावात २७० धावांची मोठी आघाडी मिळाली.
एलिट अ गट सामना शिलाँग येथील पोलो मैदानावर सुरू आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी गोव्याने ५ बाद ५५ वरून सर्वबाद ३७२ धावा केल्या. शिवेंद्र याने १७० चेंडूंत १७ चौकार व १३ षटकारांची आतषबाजी करत १९५ धावा केल्या.
त्याने अगोदर अनुज यादव (४९) याच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ७८ धावांची, तर नंतर दहाव्या क्रमांकावरील पुंडलिक नाईक (५०) याच्यासह नवव्या विकेटसाठी १७० धावांची भागीदारी करून गोव्याला मजबूत स्थिती गाठून दिली. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर मेघालयाने दुसऱ्या डावात बिनबाद १८ धावा केल्या. ते अजून २५२ धावांनी मागे आहेत.
संक्षिप्त धावफलक
मेघालय, पहिला डाव : १०२ व दुसरा डाव : ७ षटकांत बिनबाद १८.
गोवा, पहिला डाव (१ बाद ४ वरून) : ७६.३ षटकांत सर्वबाद ३७२ (आयुष वेर्लेकर १३, लखमेश पावणे १, आर्यन नार्वेकर १४, अनुज यादव ४९, शिवेंद्र भुजबळ १९५, अमन धूपर ७, दीप कसवणकर ७, पुंडलिक नाईक ५०, संतोष ४-६६, सुधीर सहानी ५-७५).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.