C K Nayudy Trophy: गोव्याचा डावाने दारुण पराभव! गुजरातच्या कर्णधाराच्या सात विकेट; मयूरचे अपयश खुपणारे

Goa Vs Gujarat: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला गुजरातविरुद्ध डाव २८० धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला.
Cricket
Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

C K Nayudy Trophy Goa Vs Gujarat

पणजी: कर्नल सी. के. नायडू करंडक २३ वर्षांखालील क्रिकेट सामन्यात गोव्याला गुजरातविरुद्ध डाव २८० धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. ब गट सामना वलसाड येथील सरदार पटेल स्टेडियमवर झाला.

गोव्याचा पहिला डाव १३१ धावांत संपुष्टात आला होता, नंतर गुजरातने ५१५ धावा करून ३८४ धावांची आघाडी संपादन केली. गोव्याचा दुसरा डाव सोमवारी तिसऱ्या दिवशी उपाहारापूर्वीच १०४ धावांत संपुष्टात आला. अकराव्या क्रमांकावरील अखेरचा गडी मनीष काकोडे याने २६ चेंडूंत सात चौकारांसह केलेल्या ३२ धावांमुळे गोव्याला ९ बाद ६० वरून धावसंख्येचे शतक ओलांडता आले. गुजरातचा कर्णधार जय मालुसरे याने अवघ्या १६ धावांत ७ गडी टिपले.

Cricket
Colonel CK Naidu Trophy: अझानच्या शतकचाच गोव्याला दिलासा, 380 धावांच्या आघाडीसह आंध्रने लादला फॉलोऑन

गोव्याचा हा स्पर्धेतील सात सामन्यांतील दुसरा पराभव ठरला. गोव्याला या लढतीतून तीन गुण मिळाले. त्यांचे एकूण ४४ गुण झाले आणि आठ संघांत सातवा क्रमांकावर घसरण झाली. गुजरातने सामन्यातून १६ गुणांची कमाई केली.

संक्षिप्त धावफलक ः गोवा, पहिला डाव ः १३१ गुजरात, पहिला डाव ः ५१५ गोवा, दुसरा डाव ः ३४.५ षटकांत सर्वबाद १०४ (अझान थोटा २०, देवन चित्तेम ०, जीवन चित्तेम ५, कौशल हट्टंगडी १२, शिवेंद्र भुजबळ १, यश कसवणकर ५, मयूर कानडे ०, दिशांक मिस्कीन ०, मिहीर गावडे नाबाद १६, लखमेश पावणे ५, मनीष काकोडे ३२, जय मालुसरे १०-६-१६-७).

Cricket
CK Naidu Trophy: गोव्याच्या पोरांची पराभव टाळण्यासाठी धडपड! पहिल्या डावातच गुजरातनं उभारली भली मोठी धावसंख्या

४ सामन्यांतील ७ डावांत ४ भोपळे

गोव्याच्या संघातील मयूर कानडे याचे अपयश खुपणारे ठरले. त्याला तब्बल ४ सामने खेळायला मिळाले, त्यात ७ पैकी ४ डावांत तो शून्यावर बाद झाला. गुजरातविरुद्ध दोन्ही डावात त्याला भोपळा फोडता आला नाही, साहजिकच ‘चष्मेबहाद्दर’ ठरला. एकंदरीत त्याने ६.२८च्या सरासरीने फक्त ४४ धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com