
Goa Vs Jammu Kashmir C K Nayudu Trophy
पणजी: सलामीचा अझान थोटा याने झळकावलेल्या जबरदस्त द्विशतकाच्या बळावर गोव्याने २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट सामन्यात जम्मू-काश्मीरवर पहिल्या डावात ८९ धावांची आघाडी प्राप्त केली. ‘ब’ गट सामना सांगे येथील जीसीए मैदानावर सुरू आहे.
गोव्याने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपकर्णधार अझानच्या २४७ धावांच्या बळावर पहिल्या डावात ४३६ धावा केल्या. त्यापूर्वी दुसऱ्या दिवशी जम्मू-काश्मीरचा पहिला डाव ३४७ धावांत संपुष्टात आला होता. सोमवारी तिसऱ्या दिवसअखेर त्यांनी दुसऱ्या डावात २ बाद ६४ धावा केल्या असून ते अजून २५ धावांनी मागे आहेत.
स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्ध मागील लढतीतील दुसऱ्या डावात १११ धावा केलेल्या डावखुऱ्या अझानने कालच्या १५६ धावांवरून पुढे खेळताना सोमवारी ३७७ चेंडूंतील खेळीत २३ चौकार व पाच षटकार मारले. त्याने आयुष वेर्लेकरसह (३७) दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांची, कर्णधार कौशल हट्टंगडीसह (३०) तिसऱ्या विकेटसाठी ८१ धावांची, तर यश कसवणकर (३४) याच्यासह चौथ्या विकेटासाठी १०२ धावांची भागीदारी केली. सोमवारी उपाहाराच्या ठोक्याला गोव्याने जम्मू-काश्मीरची धावसंख्या पार केली.
जम्मू-काश्मीर, पहिला डाव ः सर्वबाद ३४७ (लखमेश पावणे ४-६८, मनीष काकोडे ३-८३). गोवा, पहिला डाव (३ बाद २५५ वरून) ः १४०.२ षटकांत सर्वबाद ४३६ (अझान थोटा २४७, देवनकुमार चित्तेम ६, आयुष वेर्लेकर ३७, कौशल हट्टंगडी ३०, यश कसवणकर ३४, शिवेंद्र भुजबळ १३, मयूर कानडे १९, लखमेश पावणे ०, शदाब खान ०, मनीष काकोडे २५, संप्रभ फळदेसाई नाबाद ५, मुजताबा युसूफ ४-८१, जानिब जावेद ३-१३५, सर्वाशिष सिंग २-७८). जम्मू-काश्मीर, दुसरा डाव ः २३ षटकांत २ बाद ६४ (काझी जुनेद मासूद नाबाद २१, यश कसवणकर ५-०-१७-०, लखमेश पावणे ५-०-१३-१, मनीष काकोडे ७-२-१८-१, शदाब खान ६-०-१५-०).
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.