T20 Cricket Tournament: शेवट गोड! गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंची दिवाळी, आसामवर केली मात

Assam vs Goa women: छत्तीसगडमधील रायपूर येथील आरडीसीए मैदानावर झाला. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद १६६ धावा केल्या.
Goa Cricket Association
Goa Cricket Association Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: गोव्याच्या महिलांनी सीनियर टी-२० क्रिकेट स्पर्धेतील मोहिमेचा विजयी समारोप करताना आसामला ७१ धावांनी पराभूत केले. हर्षिता यादव (५८) व पूर्वजा वेर्लेकर (५६) यांनी दणकेबाज अर्धशतके नोंदविताना संघाला ११५ धावांची सलामी दिली.

एलिट ड गट सामना रविवारी छत्तीसगडमधील रायपूर येथील आरडीसीए मैदानावर झाला. गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ३ बाद १६६ धावा केल्या.

नंतर तनया नाईक (३-२५), पूर्वा भाईडकर (२-९) व सुनंदा येत्रेकर (२-१९) यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर गोव्याने आसामचा डाव १६.५ षटकांत ९५ धावांत गुंडाळला. १७ वर्षीय हर्षिता सामन्याची मानकरी ठरली.

Goa Cricket Association
Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

तिने ४६ चेंडूंतील खेळीत नऊ चौकार लगावले. पूर्वजा हिने आक्रमक खेळ करताना ४० चेंडूंतील खेळीत पाच चौकार व तीन षटकार मारले. हर्षिता व पूर्वजा यांनी १४.१ षटकांतच दमदार सलामी दिल्यामुळे गोव्याला मोठी धावसंख्या उभारणे सोपे ठरले. या दोघी एका धावेच्या अंतराने बाद झाल्यानंतर सुनंदा येत्रेकरने २२ चेंडूंत केलेल्या ३७ धावांमुळे गोव्याला दीडशतक पार करणे शक्य झाले.

Goa Cricket Association
Goa Womens Cricket: गोव्याच्या पोरी जगात भारी! टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विजेतेपद; अंतिम लढतीत उत्तर प्रदेशला केले पराभूत

संक्षिप्त धावफलक

गोवा : २० षटकांत ३ बाद १६६ (हर्षिता यादव ५८, पूर्वजा वेर्लेकर ५६, संजुला नाईक नाबाद १३, सुनंदा येत्रेकर ३७, तनिशा गायकवाड नाबाद १, मौसुमी नाराह ४-०-३१-२) वि. वि. आसाम : १६.५ षटकांत सर्वबाद ९५ (खुशी शर्मा १८, गायत्री गुरुंग १७, मैना नाराह १६, मेताली गवंडर ३-०-१८-१, सुनंदा येत्रेकर ३.५-०-१९-२, श्रेया परब २-०-२१-०, तनया नाईक ४-०-२५-३, विधी भांडारे १-०-३-०, पूर्वा भाईडकर ३-०-९-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com