Cricket Players Death: क्रीडा विश्वात खळबळ! पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात 3 क्रिकेटपटूंचा मृत्यू, बोर्डानं घेतला मोठा निर्णय

Pakistan-Afghanistan War: पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन शेजारी देशांमधील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे.
Cricket Players Death
Cricket Players DeathDainik Gomantak
Published on
Updated on

पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन शेजारी देशांमधील तणाव पुन्हा एकदा उफाळून आला आहे. दोन दिवस चाललेल्या संघर्षानंतर युद्धबंदी जाहीर करण्यात आली होती, मात्र काही तासांतच पाकिस्तानने या युद्धबंदीचा भंग करत अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागावर हवाई हल्ला केला. या हल्ल्यात तीन अफगाणिस्तानचे युवा क्रिकेटपटू ठार झाले, ज्यामुळे संपूर्ण क्रिकेटविश्व शोकमग्न झाले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (ACB) अधिकृत निवेदन जारी करत या दुःखद घटनेला दुजोरा दिला आहे.

तीन उदयोन्मुख खेळाडूंचा मृत्यू

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डानुसार, या हल्ल्यात कबीर आगा, सिबगतुल्ला आणि हारून या तीन तरुण क्रिकेटपटूंचा मृत्यू झाला आहे. हे तिन्ही खेळाडू देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये नियमितपणे खेळत होते आणि राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील होते. ते पक्तिका प्रांतातील शरण येथे एका मैत्रीपूर्ण सामन्यासाठी गेले होते. सामना संपल्यानंतर ते उर्गुनकडे परतत असताना हवाई हल्ला झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

Cricket Players Death
Goa Womens Cricket: गोव्याच्या पोरी जगात भारी! टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विजेतेपद; अंतिम लढतीत उत्तर प्रदेशला केले पराभूत

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, “या तरुण खेळाडूंचा मृत्यू अफगाण क्रिकेटसाठी मोठा धक्का आहे. त्यांनी आपली कारकीर्द नुकतीच सुरू केली होती आणि त्यांच्या प्रतिभेमुळे अफगाण क्रिकेटचा उज्ज्वल भविष्य दिसत होते.” बोर्डाने या तिन्ही खेळाडूंना “शहीद” घोषित केले असून त्यांच्या कुटुंबीयांबद्दल संवेदना व्यक्त केल्या आहेत.

पाकिस्तानविरोधात निदर्शने

अधिकृत माहितीनुसार, पाकिस्तानच्या हवाई दलाने केलेल्या या हल्ल्यात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये ५ नागरिक आणि ३ क्रिकेटपटूंचा समावेश आहे. आणखी सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर अफगाणिस्तानमध्ये संतापाची लाट उसळली असून नागरिकांनी पाकिस्तानविरोधात निदर्शने सुरू केली आहेत.

तिरंगी मालिकेतून अफगाणिस्तानची माघार

या दुर्दैवी घटनेनंतर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानमध्ये आयोजित होणाऱ्या तिरंगी मालिकेतून माघार घेतली आहे. या मालिकेत पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान हे तीन संघ सहभागी होणार होते. ACB च्या या निर्णयानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट समुदायाने पाकिस्तानकडून उत्तरदायित्वाची मागणी केली आहे.

Cricket Players Death
Goa Road Repair: 'नोव्हेंबर अखेरपर्यंत गोव्यातील रस्ते उत्तम स्थितीत', मंत्री कामतांनी दिली ग्वाही; रस्ता खोदणाऱ्यांसाठी दिला इशारा

तणाव वाढण्याची शक्यता

या हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील सीमावाद पुन्हा उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, या हल्ल्यामुळे फक्त सीमारेषेवरील परिस्थितीच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातील संबंधांवरही परिणाम होऊ शकतो. अफगाणिस्तान सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झपाट्याने प्रगती करत आहे, आणि अशा घटनांमुळे देशातील तरुण खेळाडूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com