Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याची उडाली दाणादाण! सुयशची खेळी व्यर्थ; आंध्रने नोंदवला सहज विजय

Andhra Pradesh Beat Goa: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत नियोजनशून्य दृ्ष्टिकोन बाळगून खेळणाऱ्या गोव्याला बुधवारी सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले.
Goa Cricket
Goa CricketDainik
Published on
Updated on

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत नियोजनशून्य दृ्ष्टिकोन बाळगून खेळणाऱ्या गोव्याला बुधवारी सलग तिसऱ्या पराभवास सामोरे जावे लागले. ई गटातील लढतीत आंध्रने त्यांना आठ विकेट आणि २६ चेंडू राखून सहजपणे नमविले.

हैदराबाद येथे झालेल्या लढतीत गोव्याने प्रथम फलंदाजी करताना सुयश प्रभुदेसाईच्या (नाबाद ७१) शानदार अर्धशतकाच्या बळावर ५ बाद १५४ धावा केल्या. आंध्रला १५५ धावांचे आव्हान गोव्याच्या कमजोर गोलंदाजीसमोर अवघड ठरले नाही. सलामीचा के. एस. भारत व कर्णधार रिकी भुई यांच्या आक्रमक अर्धशतकांच्या बळावर त्यांनी १५.४ षटकांत दोन विकेटच्या मोबदल्यास एकतर्फी विजयाची नोंद केली.

Goa Cricket
Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचा सलग दुसरा पराभव, दवडली विजयाची संधी; सेनादल 22 धावांनी विजयी

भारत (India) व रिकी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९८ धावांची अभेद्य भागीदारी केली. भारत याने ३८ चेंडूंत सहा चौकार व दोन षटकारांसह नाबाद ५७ धावा केल्या. तुलनेत अधिक आक्रमकपणे खेळलेल्या रिकी याने फक्त ३८ चेंडूंत पाच चौकार व सहा षटकारांसह नाबाद ७२ धावा नोंदविल्या.

प्रथम फलंदाजी करताना गोव्याच्या फलंदाजांना आंध्रच्या फिरकी गोलंदाजांनी रोखून धरले. के. व्ही. सिद्धार्थ व कश्यप बखले ही नवी सलामी जोडी अपयशी ठरली. कर्णधार दीपराज गावकर व दर्शन मिसाळ यांना बढती मिळाली, पण ते त्याचा लाभ उठवू शकले नाहीत.

Goa Cricket
Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 'दीपराज' करणार गोव्याचं नेतृत्व; सुयश उपकर्णधार!

सुयशने खिंड लढविताना विकास सिंग (२५, ३० चेंडू, ३ चौकार) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी केली, मात्र टी-२० क्रिकेटमध्ये ती संथ ठरली. डावातील अखेरच्या चार षटकांत सुयशने कल्पकपणे फलंदाजी केल्यामुळे गोव्याला दीडशे धावांचा टप्पा गाठता आला. त्याने ५१ चेंडूंत नऊ चौकारांसह नाबाद ७१ धावा केल्या.

गोव्याला (Goa) अगोदरच्या लढतीत मुंबईकडून २६ धावांनी, तर सेनादलाकडून २२ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यांचा ई गटातील चौथा सामना एक डिसेंबर रोजी केरळविरुद्ध होईल.

Goa Cricket
Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

संक्षिप्त धावफलक

गोवा ः २० षटकांत ५ बाद १५४ (के. व्ही. सिद्धार्थ १, कश्यप बखले १२, दीपराज गावकर १८, दर्शन मिसाळ ७, सुयश प्रभुदेसाई नाबाद ७१, विकास सिंग २५, अर्जुन तेंडुलकर नाबाद १२, स्टीफन ४-०-४२-२, के. व्ही. शशिकांत ४-०-३८-२, पीव्हीएसएन राजू ४-०-२८-०, त्रिपूर्ण विजय ४-०-१७-०, बी. यशवंत ४-०-२५-०) पराभूत वि. आंध्र ः १५.४ षटकांत २ बाद १५५ (के. एस. भारत नाबाद ५७, अश्विन हेब्बर १३, रिकी भुई नाबाद ७२, अर्जुन तेंडुलकर ३.४-०-३६-१, शुभम तारी ३-०-२४-०, हेरंब परब २-०-२६-०, दर्शन मिसाळ ३-०-३४-१, विकास सिंग ३-०-२६-०, दीपराज गावकर १-०-८-०).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com