Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचा सलग दुसरा पराभव, दवडली विजयाची संधी; सेनादल 22 धावांनी विजयी

Syed Mushtaq Ali Trophy 2024: खेरच्या २७ चेंडूंत ६६ धावांची आवश्यकता असताना गोव्यापाशी पुरेसे फलंदाज होते, परंतु सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट सामन्यात त्यांना विजय शक्य झाला नाही. सेनादलाने ई गटातील सामना अखेर २२ धावांनी सहजपणे जिंकला.
Goa Cricket
Goa CricketDainik Gomantak
Published on
Updated on

Syed Mushtaq Ali Cricket Trophy 2024 Goa VS Army

पणजी: अखेरच्या २७ चेंडूंत ६६ धावांची आवश्यकता असताना गोव्यापाशी पुरेसे फलंदाज होते, परंतु सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट सामन्यात त्यांना विजय शक्य झाला नाही. सेनादलाने ई गटातील सामना अखेर २२ धावांनी सहजपणे जिंकला.

हैदराबाद येथील जिमखाना मैदानावर झालेल्या या लढतीत १८८ धावांच्या आव्हानासमोर गोव्याला ५ बाद १६५ धावांचीच मजल मारता आली. गोव्याचा हा सलग दुसरा पराभव ठरला. अगोदरच्या लढतीत त्यांना मुंबईने २६ धावांनी हरविले होते. गोव्याचा स्पर्धेतील पुढील सामना २७ रोजी आंध्रविरुद्ध होईल.

सलामीचा रोहन कदम ४९ धावांवर जखमी निवृत्त झाल्याने माघारी परतला. नंतर १५.२ षटकांत गोव्याची १ बाद १२२ अशी स्थिती होती. मात्र पुढच्या चेंडूवर हुकमी फलंदाज सुयश प्रभुदेसाई याला मोहित राठी याने त्रिफळाचीत बाद झाल्यानंतर जम बसलेला के. व्ही. सिद्धार्थ खेळपट्टीवर असूनही गोव्याला विजयी आव्हान पेलले नाही. सिद्धार्थने ४१ चेंडूंत तीन चौकार व तीन षटकारांच्या मदतीने ५५ धावा केल्या. अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर तो बाद झाला.

त्यापूर्वी, गोव्याने नाणेफेक जिंकून सेनादलास प्रथम फलंदाजीस पाचारण केले. कुंवर पाठक (६३) व रजत पालिवाल (४०) यांनी दिलेली ८६ धावांची सलामी, तसेच मोहित राठी याने १६ चेंडूंत चार षटकारांसह केलेल्या ३४ धावांमुळे सेनादलास ७ बाद १८७ धावा करणे शक्य झाले. तिघे फलंदाज धावबाद झाल्यामुळे सेनादलाचा डाव १५व्या षटकात ५ बाद १३३ असा घसरला होता, मात्र राठीच्या फटकेबाजीमुळे त्यांनी आव्हानात्मक धावसंख्या उभारली.

Goa Cricket
Tanvi Vast Arrest: हेल्पर नव्हे ही तर भामटीच! गोव्यात वृद्धांना फसवणाऱ्या तन्वीला अटक

संक्षिप्त धावफलक

सेनादल ः २० षटकांत ७ बाद १८७ (कुंवर पाठक ६३, रजल पालिवाल ४०, मोहित अहलावत १८, मोहित राठी ३४, अर्जुन तेंडुलकर ३-०-१९-०, शुभम तारी ४-०-३७-२, हेरंब परब ४-०-४१-१, मोहित रेडकर ४-०-२६-०, दर्शन मिसाळ १-०-२२-०, दीपराज गावकर ३-०-२७-१, सुयश प्रभुदेसाई १-०-९-०) वि. वि. गोवा ः २० षटकांत ५ बाद १६५ (ईशान गडेकर २१, रोहन कदम ४९, के. व्ही. सिद्धार्थ ५५, सुयश प्रभुदेसाई ३, दर्शन मिसाळ ११, दीपराज गावकर नाबाद ११, विकास सिंग ०, मोहित रेडकर नाबाद ७, पूनम पुनिया ४-०-१९-२, मोहित राठी ४-०-२९-१, विशाल गौर ४-०-३२-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com