Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

Syed Mushtaq Ali Trophy 2024: आयपीएलसाठी रविवारी होत असलेल्या मेगा लिलावात सर्वाधिक बोली लागण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या श्रेयस अय्यरने आपली क्षमता सिद्ध केली. अवघ्या ५७ चेंडूंत नाबाद १३० धावांचा झंझावात सादर केला.
Shreyas Iyer, Syed Mushtaq Ali Trophy 2024
Shreyas IyerDainik Gomantak
Published on
Updated on

Syed Mushtaq Ali Trophy 2024 Goa Vs Mumbai

हैदराबाद: आयपीएलसाठी रविवारी होत असलेल्या मेगा लिलावात सर्वाधिक बोली लागण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या श्रेयस अय्यरने आपली क्षमता सिद्ध केली. अवघ्या ५७ चेंडूंत नाबाद १३० धावांचा झंझावात सादर केला, त्यामुळे सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत मुंबईने गोव्याचा २६ धावांनी पराभव केला.

११ चौकार आणि १० षटकार अशी तुफानी टोलेबाजी श्रेयसने सादर केली, त्यामुळे मुंबईने प्रथम फलंदाजीत २० षटकांत चार बाद २५० धावा उभारल्या, तरीही २६ धावांचा विजय हाती लागला. गोव्याने मोठ्या धावसंख्येचे ओझे न घेता पाठलाग कायम ठेवला.

ईशान गडेकरने १६ चेंडूंतच ४० धावा फटकावल्यामुळे गोव्याने ८.२ षटकांत तीन बाद ९४ अशी सुरवात केली होती. त्यानंतर सुयश प्रभुदेसाईने ३६ चेंडूंत ५२ धावांची खेळी केली, त्यामुळे गोव्याचे आव्हान कायम होते. विकास सिंगने तर २१ चेंडूंत नाबाद ४७ धावा केल्या; परंतु २५० धावांचे आव्हान मोठे ठरले. गोव्याने २० षटकांत ८ बाद २२४ धावा केल्या.

Shreyas Iyer, Syed Mushtaq Ali Trophy 2024
Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

संक्षिप्त धावफलक

मुंबई ः २० षटकांत ४ बाद २५० (पृथ्वी शॉ ३३-२२ चेंडू, ५ चौकार, १ षटकार, श्रेयस अय्यर नाबाद १३०-५७ चेंडू, ११ चौकार, १० षटकार, अजिंक्य रहाणे १३, शम्स मुलानी ४१-२४ चेंडू, ४ चौकार, २ षटकार, अर्जुन तेंडुलकर ४-०-४८-०, शुभम तारी ४-०-३७-१, हेरंब परब ४-०-५९-१, दर्शन मिसाळ ४-०-३५-२, विकास सिंग ३-०-३५-०, मोहित रेडकर १-०-१५-०) वि. वि. गोवा ः २० षटकांत ८ बाद २२४ (ईशान गडेकर ४०-१६ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, रोहन कदम १३, के. व्ही. सिद्धार्थ १०, सुयश प्रभुदेसाई ५२-३६ चेंडू, ९ चौकार, दर्शन मिसाळ १९, दीपराज गावकर १४, विकास सिंग नाबाद ४७-२१ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, मोहित रेडकर ०, अर्जुन तेंडुलकर ९, हेरंब परब नाबाद ६, शार्दुल ठाकूर ४-०-४३-१, मोहित अवस्थी ४-०-६२-१, रॉयस्टन डायस ४-०-४७-२, तनुष कोटियन ३-०-२७-१, शम्स मुलानी ३-०-२५-१, सूर्यांश शेडगे २-०-१८-२).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com