Ranji Trophy: कर्णधारपदाच्या जबाबदारीसह वैयक्तिक कामगिरीही बहरली! सलग तिसऱ्या रणजी मोसमात अष्टपैलू दर्शन करणार गोव्याचं नेतृत्व

All-rounder Darshan Misal: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसऱ्या मोसमात गोव्याचे नेतृत्व करण्यासाठी अष्टपैलू क्रिकेटपटू दर्शन मिसाळ सज्ज झाला आहे.
Ranji Trophy: कर्णधारपदाच्या जबाबदारीसह वैयक्तिक कामगिरीही बहरली! सलग तिसऱ्या रणजी मोसमात अष्टपैलू दर्शन करणार गोव्याचं नेतृत्व
Darshan MisalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cricket: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत सलग तिसऱ्या मोसमात गोव्याचे नेतृत्व करण्यासाठी अष्टपैलू क्रिकेटपटू दर्शन मिसाळ सज्ज झाला आहे. मागील दोन मोसमात संघाचे नेतृत्व करताना त्याने वैयक्तिक पातळीवर सफल अष्टपैलू कामगिरीने मैदानावर ठसा उमटविला.

गोव्याचे सलग तीन रणजी क्रिकेट मोसमात नेतृत्व करणारा सगुण कामत (२०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९) अखेरचा कर्णधार होता. आता दर्शनला हा मान मिळाला आहे. कर्णधारपदाची जबाबदारी पेलताना दोन मोसमात खेळाडू या नात्याने त्याची कामगिरी लौकिकास साजेशी ठरली, गोलंदाजीत त्याने बळींचे अर्धशतक नोंदविले आहे. २०१७-१८ मोसमात नियमित कर्णधार सगुण कामत जायबंदी झाल्यानंतर दर्शनने दोन सामने कर्णधारपद भूषविले होते, मात्र मागील दोन मोसमात तो पूर्णवेळ नेतृत्व करत आहे. यंदा पहिल्या दोन सामन्यांसाठी संघ जाहीर करण्यात आला असून त्याच्याकडेच नेतृत्व आहे.

Ranji Trophy: कर्णधारपदाच्या जबाबदारीसह वैयक्तिक कामगिरीही बहरली! सलग तिसऱ्या रणजी मोसमात अष्टपैलू दर्शन करणार गोव्याचं नेतृत्व
Ranji Trophy 2024 Final: फायनलसाठी वानखेडे स्टेडियमवर सचिन-रोहितची उपस्थिती

३२ वर्षीय दर्शनने सांगितले, की ‘‘संघाचे कर्णधारपद भूषविताना मी वैयक्तिक कामगिरीवर अजिबात परिणाम होऊ देत नाही. दोन्ही भूमिकांत तारतम्य राखतो. खरं म्हणजे, कर्णधार बनल्यानंतर मागील दोन मोसमात मी कामगिरीत जास्त सातत्य राखले आहे. एकंदरीत कर्णधारपदाचा मी आनंद लुटत आहे.’’ गतमोसमात रणजी करंडक स्पर्धेच्या एलिट विभागात ३१व्या स्थानी राहिल्यामुळे गोव्याची प्लेट गटात पदावनती झाली.

Ranji Trophy: कर्णधारपदाच्या जबाबदारीसह वैयक्तिक कामगिरीही बहरली! सलग तिसऱ्या रणजी मोसमात अष्टपैलू दर्शन करणार गोव्याचं नेतृत्व
Ranji Trophy Final: अय्यरचं शतक 5 धावांनं हुकलं, पण मुशीरनं 136 धावांसह मैदान जिंकलं; रोहित-सचिनचीही वानखेडेवर उपस्थिती

२०२४-२५ मोसमोत संघ दुय्यम श्रेणीत खेळत असून अव्वल कामगिरीसह गोव्याला पुन्हा एलिट विभागात जाणे शक्य आहे. याविषयी तो म्हणाला, की ‘‘निश्चितच आम्हाला पुढील मोसमात एलिट गटात खेळायचे आहे. त्यासाठी आम्ही मेहनत घेतली आहे. प्लेट गटातील अव्वल कामगिरीसह एलिट गटात पात्रता हेच आमचे मुख्य ध्येय आहे.’’ कर्णधारपद भूषविताना वैयक्तिक कामगिरीत दर्शनने मागील दोन मोसमात (२०२२-२३ व २०२३-२४) मिळून १४ सामन्यांत डावखुऱ्या फलंदाजीने ७९४ धावा केल्या, तर डावखुऱ्या फिरकीची कमाल दाखविताना ५३ गडी बाद केले. यंदाही तो गोव्याचा मुख्य गोलंदाज असेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com