Goa Badminton: बॅडमिंटन कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा; अखिल गोवा बॅडमिंटन स्पर्धेत शाहीन-सुफियाची चमक, अंतिम फेरीत दाखल

Goa Badminton Tournament Finalists: स्पर्धा पेडे-म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलात सुरू आहे.
Goa Badminton Tournament Finalists
Goa BadmintonDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: म्हापसा शटलर्स यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या अखिल गोवा राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत सी. के. शाहीन व सुफिया शेख यांनी तीन विभागात, तर अद्वैत बाळकृष्णन व अमायरा धुमटकर यांनी दोन विभागात अंतिम फेरी गाठली. स्पर्धा पेडे-म्हापसा येथील दयानंद बांदोडकर क्रीडा संकुलात सुरू आहे.

अश्विन मन्नामबालथ, आरोही कौटणकर, मायकल मारे, प्रतीक नाईक बोरकर, कोमल कोठारी, शिवांजली थिटे यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. १३ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत मायकल मारे व प्रतीक नाईक बोरकर यांच्यात विजेतेपदासाठी लढत होईल. १३ वर्षांखालील मुलींत अमायरा धुमटकर व कोमल कोठारी यांच्यात अंतिम लढत खेळली जाईल.

Goa Badminton Tournament Finalists
Goa Sport: स्वप्नील अस्नोडकर यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी; बीसीसीआयच्या मोहाली येथील ‘सीओई’ शिबिरासाठी प्रशिक्षकपदी नियुक्ती

मुलांच्या दुहेरीत मायकल मारे व अयांश संके यांच्यासमोर प्रतीक नाईक बोरकर व वरुण सहकारी यांचे आव्हान असेल. मुलींच्या दुहेरीत अमायरा व कोमल अन्विता पुजारी व अश्बा तहसिलदार यांच्याविरुद्ध अंतिम फेरीत खेळतील.१९ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत सी. के. शाहीन व अद्वैत बाळकृष्णन यांच्यात विजेतेपदासाठी चुरस असेल.

शाहीन याने मुलांच्या दुहेरीत अश्विन मन्नाम्बालाथ याच्या साथीत अंतिम फेरी गाठली. या जोडीला अद्वैत व वंश खेडकर जोडीचे आव्हान असेल. शाहीन याने मिश्र दुहेरीत सुफिया शेख हिच्या साथीत अंतिम फेरीत प्रवेश केला. सुफिया हिने मुलींच्या एकेरीतही अंतिम फेरी गाठली असून तिला शिवांजली थिटे हिचे आव्हान असेल. आरोही कौटणकर मुलींच्या दुहेरीत डिंपल रेवणकर हिच्या साथीत विजेतेपदासाठी खेळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Asian Games Final IND vs PAK
Sam Ayub celebration controversy video
Goa 97 Voters Electoral Roll
Aarush Pawaskar World Junior Ranking
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com