Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Porvorim Connectivity Infrastructure: पर्वरीचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांमध्येही त्याच वेगाने वाढ होणे आवश्यक आहे.
Porvorim Connectivity Infrastructure
Porvorim DevelopmentDainik Gomantak
Published on
Updated on

रोहन खंवटे

पर्वरीचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता कनेक्टिव्हिटीच्या पायाभूत सुविधांमध्येही त्याच वेगाने वाढ होणे आवश्यक आहे. सहा पदरी फ्लायओव्हर हा माझा स्वप्नवत प्रकल्प होता. अनेक वर्षे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आज हा प्रकल्प पर्वरीच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

सतत बहरणाऱ्या चैतन्यामुळे पर्वरी हा मतदारसंघ गोव्याचे सर्वोत्तम रूप दर्शवणारा भाग म्हणून ओळखला जातो. येथे कौटुंबिक जिव्हाळा आणि घट्ट सामाजिक बंध यांचा संगम गोव्याच्या प्रशासकीय, नाविन्यपूर्ण आणि व्यावसायिक केंद्रस्थानी असलेल्या वाढत्या शहरी भागातील ऊर्जा आकांक्षा आणि संधींशी होतो. गेल्या १५ वर्षांत माझ्या जनतेने दाखवलेला विश्वास आणि दिलेला पाठिंबा यामुळे येथे आमूलाग्र बदल घडले आहेत. पर्वरीला वास्तव्यासाठी, काम करण्यासाठी आणि कुटुंबांसाठी एक उत्तम ठिकाण बनवणे हेच आमच्या प्रत्येक प्रयत्नाचे उद्दिष्ट राहिले आहे.

Porvorim Connectivity Infrastructure
Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

माझ्या विकासाच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी एक साधा विश्वास आहे; विकासामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा दर्जा उंचावला पाहिजे. खरी प्रगती केवळ मोठ्या प्रकल्पांमधून दिसून येत नाही; तर त्या प्रकल्पांमुळे नागरिकांना सुरक्षितता, सुविधा, चांगले आरोग्य आणि अधिक चांगले जीवनमान मिळते का, यावर तिचे खरे मोजमाप होते.पर्वरीचा शहरी विस्तार होत असला तरी आपल्या कृषी परंपरेची मुळे आपण कायम जपली आहेत.

आपल्या शेतकऱ्यांचा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर, कौशल्य विकास, सरकारी योजना, अनुदाने आणि विविध लाभांपर्यंत सुलभ प्रवेश मिळवून देण्यावर आम्ही सातत्याने भर देत आहोत. उच्च उत्पादनक्षम बियाणे, आधुनिक हार्वेस्टर, ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रसामग्रीच्या वापरामुळे शेती अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि फायदेशीर करण्याचा प्रयत्न आहे. यामुळे नव्या पिढीलाही शेतीकडे आकर्षित करून अन्न स्वयंपूर्णतेच्या दिशेनेही आपण पुढे जाऊ शकू.

नाना-नानी पार्क, योगा पार्क, जिमखाना तसेच विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी गोव्यातील पहिले समर्पित दिव्या रंजन पार्क यांसारख्या सुविधांमुळे पर्वरीतील जीवनमान उंचावण्यास मदत झाली आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा हा इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा अभिमान व जतन करण्याच्या कटिबद्धतेचे प्रतीक म्हणून दिमाखात उभा आहे.

पर्वरीचा वेगाने होणारा विकास लक्षात घेता ‘कनेक्टिव्हिटी’च्या पायाभूत सुविधांतही त्याच वेगाने वाढ होणे आवश्यक आहे. सहा पदरी फ्लायओव्हर हा माझा स्वप्नवत प्रकल्प होता. अनेक वर्षे त्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आणि आज हा प्रकल्प पर्वरीच्या विकासातील महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. रस्त्यांची नियमित देखभाल, नवीन मार्ग खुले करणे आणि विद्यमान रस्त्यांचे आधुनिकीकरण हे आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग आहे. सुकूर येथील नवीन ‘ओडीपी’ रोडसारखे प्रकल्प पर्वरीतील वाहतूक आणि संपर्कक्षमता अधिक सक्षम करतील.

मतदारसंघातील दीर्घकाळ प्रलंबित गरजा पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. मालिम जंक्शनचा पुनर्विकास, पेन्ह द फ्रान्स येथे डिजिटल लायब्ररीसह आधुनिक पंचायत भवनाची उभारणी तसेच अंबिर्ण रोड आर्चसारख्या वारसास्थळ-केंद्रित उपक्रमांमुळे सुविधा आणि स्थानिक ओळख या दोन्हींना बळ मिळणार आहे.

Porvorim Connectivity Infrastructure
Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी वाहतूक कोंडी कमी करणे आणि प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत करणे हे आमच्या प्रमुख प्राधान्यांपैकी एक आहे. पर्वरी बाजार आणि तिस्क-सुकूर ते तीन बिल्डिंग-पेन्ह द फ्रांक यांना जोडणारा प्रस्तावित फ्लायओव्हर वाहतूक प्रवाह सुधारण्यात महत्त्वपूर्ण ठरेल. सुकूर, पेन्ह द फ्रांक आणि साल्वादोर द मुंद येथील रस्ते रुंदीकरणाची कामे तसेच पादचारी सुविधांमध्ये सुधारणा यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यास मदत होईल.

वाढत्या पर्वरीसाठी पुरेसा आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा करून देणे हे माझे नेहमीच प्राधान्य राहिलेत. पाणीपुरवठा साखळीच्या शेवटच्या टप्प्यावर पर्वरी असल्यामुळे निर्माण होणारी पाणीटंचाई कायमस्वरूपी दूर करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित १५ एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न केले. या प्रकल्पाची संकल्पना आता इतर मतदारसंघांतही राबवली जात आहे. पर्वरीतील नागरिकांना उत्तम आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत.

सुशासन हे तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा ते नागरिकांसाठी सहज उपलब्ध आणि तत्पर प्रतिसाद देणारे असते. त्यामुळे साप्ताहिक मतदारसंघ दिन तसेच पेन्ह द फ्रांक आणि सुकूर येथील विस्तार कार्यालयांच्या माध्यमातून नागरिकांना सरकारी सेवा, योजना आणि तक्रार निवारण यंत्रणांपर्यंत अधिक सुलभ प्रवेश मिळावा, यावर भर दिला आहे. ज्येष्ठांसाठी समर्पित ज्येष्ठ नागरिक उद्यान आणि डे-केअर सेंटरच्या योजनांमधून ज्येष्ठांना सन्मानाने जीवन जगण्यासाठी आवश्यक वातावरण उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.

Porvorim Connectivity Infrastructure
Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

आपत्ती व्यवस्थापनाची क्षमता वाढवण्यासाठी गोव्यातील पहिले ‘नॅशनल सायक्लोनिक डिझास्टर सेंटर’ अग्निशमन विभागासोबत भागीदारीत कार्यरत झाले आहे. सुकूर मल्टिपर्पज ग्राउंड, पिकलबॉल आणि पॅडलबॉल कोर्ट्स, तिन्ही पंचायतींमधील फुटसाल मैदाने, क्रीडांगण आणि पेन्ह द फ्रांक येथील क्रिकेट प्रशिक्षण केंद्रे यांसारख्या सुविधांना प्रोत्साहन दिले जात आहे. सुकूर येथे पूर्ण क्षमतेच्या क्रिकेट मैदानाचा विकास करण्यात येत आहे.

पर्वरीची सर्वात मोठी ताकद म्हणजे येथील जनता आणि समृद्ध सांस्कृतिक जीवन. विविध सण, उत्सव आणि सामुदायिक कार्यक्रम नागरिकांना एकत्र आणतात आणि सामाजिक बंध अधिक दृढ करतात. ‘नोमोझो’, कार्निव्हल आणि शिगमो यांसह विविध सांस्कृतिक आणि धार्मिक उत्सव पर्वरीची विविधता, सलोखा आणि सामायिक परंपरा अधोरेखित करतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com