New Education Policy: नवा आराखडा, नवी पुस्तके! नवीन शैक्षणिक धोरणाने बदलले देशातील शिक्षणाचे चित्र

Marathi Textbook Controversy: गोमंतकीय अभ्यासक्रमात लागू असलेल्या पाठ्यपुस्तकांतील चुका उघडकीस आल्याने अनेकदा वाद उफाळून आले अन् नंतर शमलेही आहेत.
Marathi Textbook Controversy
New Education PolicyDainik Gomantak
Published on
Updated on

गोमंतकीय अभ्यासक्रमात लागू असलेल्या पाठ्यपुस्तकांतील चुका उघडकीस आल्याने अनेकदा वाद उफाळून आले अन् नंतर शमलेही आहेत. नुकताच मराठी पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीत गोमंतकीय लेखकांचा टक्का कमी अन् बाहेरच्या लेखकांची सद्दी असल्याचा मुद्दाही चर्चेत आला. मुलांच्या आकलन क्षमतेस अनुसरून पाठ्यपुस्तकांची निर्मिती झाल्याचे सांगून पाठ्यपुस्तके तीच राहतील, असा दावा करून ‘जीएससीईआरटी’ने आढाव्यानंतर फेरबदलाची तयारी दर्शवली आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तकाबाहेरचा प्रांतवादाचा ‘धडा’ शिक्षण क्षेत्राने अनुभवले.

राज्यात आणि देशात नवीन शैक्षणिक धोरण २०२० (एनईपी) अमंलबजावणीला सुरूवात झाली आणि शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हे नवीन धोरण म्हणजे काय हे समजावण्यापासून त्याच्या अमंलबजावणीपर्यंत अनेक तर्क-वितर्क समोर आले. काहींनी या धोरणाला विरोध केला तर मोठ्या प्रमाणात या निर्णयाचे स्वागतच केले.

Marathi Textbook Controversy
Goa Education: मराठी-कोकणी पाठ्यपुस्तकांचा वाद संपला! शिक्षण खात्याने घेतला विद्यार्थ्यांच्या हिताचा 'हा' मोठा निर्णय

एनईपी हे विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे आणि पुढच्या वर्गात प्रवेश देणे या प्रणालीला कडाडून विरोध करते या उलट परीक्षा आणि पाठ शिकविणे यांना प्राधान्य न देता प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या सामाजिक, भावनिक, शारिरीक आणि मूल्यवर्धित विकास कशा पद्धतीने होईल, याला प्राधान्य देण्यात येते. ज्यावेळी नवीन शैक्षणिक धोरणाची अमंलबजावणी करण्यात आली त्यावेळी त्या अनुषंगाने नवीन आराखडा, अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तके निर्मितीला सुरूवात झाली.

एनईपीला अनुसरून पाठ्यपुस्तके निर्मितीसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आणि राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर पाठ्यपुस्तकांची निर्मिती करण्यात आली. ही पुस्तके तयार करताना काही मार्गदर्शक सूचना स्वीकारण्यात आल्या आणि पुस्तकांची निर्मिती झाली. सध्या राज्यात मराठी आणि कोकणी पाठ्यपुस्तकांच्या अनुषंगाने वादंग उठले आहे, जे शमविण्याचा प्रयत्न ‘जीएससीआरटी’ने केला आहे.

Marathi Textbook Controversy
Goa Education: गोव्याचा स्थानिक वारसा आता अभ्यासक्रमात, NEP-अनुरूप पाठ्यपुस्तकांची सर्व वर्गांत अंमलबजावणी

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने जी पाठ्यपुस्तक निर्मितीच्या अनुषंगाने जी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत, त्यात प्रामुख्याने जुन्या समितीवर असणारा एक सभासद नव्या पाठ्यपुस्तक समितीवर असावा. जेणेकरून नव्या समितीला नव्याने पुस्तक निर्मितीवेळी मदत होईल. पुर्नरावृत्ती होणार नाही वा इतर माहिती मिळण्यास मदत मिळेल.

नवीन पाठ्यपुस्तकांची निर्मिती करताना प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला आणि त्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या वयोमानानुसार त्यांच्या आकलन क्षमतेचा विचार करूनच या पुस्तकांची निर्मिती केली असून त्यात काही बदल करायचे असतील तर निश्‍चितपणे फेररचना समितीकडून करण्यात येतील.

-मेघना शेटगावकर, संचालक, जीएससीईआरटी.

Marathi Textbook Controversy
Textbook Shortage: उन्हाळी सत्र संपत आलं; मराठी पुस्तकाचा पत्ता नाही, नववीच्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय; हिंदीचे पुस्तकही 15 दिवस उशिराने उपलब्ध

मराठी पाठ्यपुस्तकांमध्ये गोमंतकीय साहित्यिकांच्या साहित्यासोबतच गोमंतकीय संस्कृती, परंपरा, येथील पर्यावरण, लोकजीवनाची माहिती देणाऱ्या साहित्याची निवड करत पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. येत्या काळात जी पुस्तके येणार आहेत त्यात गोमंतकीय लेखकांचे साहित्य मुबलक प्रमाणात असेल.

- प्रा. अनिल सामंत. मराठी पाठ्यपुस्तक समिती सभासद

‘जीएससीईआरटी’ने जी पाठ्यपुस्तके प्रकाशित केली त्यात प्रामुख्याने गोमंतकीय आणि बिगर गोमंतकीय लेखक किती यावरून वाद झाला आहे परंतु मार्गदर्शन सूचनांचा आढावा घेतल्यास त्यात गोमंतकीय लेखकांसोबत बिगर गोमंतकीय लेखकांचे प्रामुख्याने सांगायचे झाल्यास भारतीय लेखकांचे साहित्य घेण्यास परवानगी आहे.

Marathi Textbook Controversy
‘गोवननेस’ म्हणजे पोर्तुगीजपूर्वकालीन गोवा साकारण्याची कल्पकता नव्हे तर..! सांस्कृतिक अधिशेष

परंतु नेमके किती टक्के लेखक असावेत याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी पाठ्यपुस्तक समिती आणि ‘जीएससीईआरटी’वर अवलंबून आहे आणि याच नियमाचा आधार घेत बिगर गोमंतकीय किंवा भारतीय लेखकांच्या कविता, पाठांचा समावेश करण्यात आलेला आहे.

विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे आकर्षित करतील, असे उपक्रम राबवावेत. जीवन मूल्यांना प्राधान्य देणारे, पर्यावरणीय जबाबदारी, सर्वसमावेशकता, आरोग्य आणि स्वच्छता, संविधानिक मूल्ये आणि जबाबदार नागरिक घडविण्यासाठी आवश्‍यक अशा मूल्यांना प्राधान्य देणाऱ्या पाठ्यपुस्तकाची निर्मिती करण्यात यावी, असे नवे धोरण सांगते. तसेच पाठ्यपुस्तकात गोव्याचा इतिहास, भूगोल, जैवविविधता,संस्कृती, परंपरा आणि वारसा, लोककला, कावी कला आदींचाही समावेश असावा. या सर्व विषयांना स्पर्श करतील असे साहित्य नव्याने ‘जीएससीईआरटी’ने तयार केलेल्या पाठ्यपुस्तकांमध्ये निश्‍चितपणे आहे.

Marathi Textbook Controversy
Teacher Transfer Protest: बदली रद्द करा! शिक्षिकेच्या तडकाफडकी बदलीविरोधात गावडोंगरी शाळेतील विद्यार्थी पटांगणात ठाण मांडून; पालक आक्रमक

स्थानिक लेखकांना प्राधान्य हवेच

भाषा विषयक पाठ्यपुस्तक तयार करणे म्हणजे फक्त प्रथितयश लेखकांचे साहित्य घेणे नव्हे. याउलट प्रथितयश लेखकांची भाषा उपरोल्लेखित आयामाच्या दृष्टीने विद्यार्थी स्तरावर योग्य ठरतीलच, असे नाही आणि त्याचप्रमाणे त्या त्या स्तरावर रचना, व्याकरण व शब्दसंपत्ती या दृष्टीनेही योग्य ठरणार नाही. भाषा विषयक पाठ्यपुस्तकांत बहुसंख्य लेखक स्थानिक असावे लागतात. अर्थात उच्च स्तरीय साहित्य अल्प प्रमाणात घेणे आवश्यक आहे, तसेच अशा प्रथितयश हयात लेखकांकडून असे पाठही लिहून घेता येतात वा एखाद्या पाठांचे हवे तसे पुनर्लेखनही करून घेता येते.

दबाव येणे शक्य

पाठ्यपुस्तक तयार करताना आपलेच लिखाण किंवा कविता घ्यावी, यासाठी प्रचंड दबाव अभ्यास मंडळ व संपादक मंडळावर येण्याची शक्यता असते, म्हणूनच तटस्थ वृत्तीनेच काम करावे लागते. पाठ्यपुस्तक निर्मितीनंतरच परीक्षण मंडळाकडे पाठविले जाते. या सर्व नियुक्त्यांसाठीं काही लिखित नियम हवेत. उदाहरणार्थ एखादा सदस्य एकाच मंडळावर असावा व त्याला दुहेरी भूमिका असू नये. तो अन्य मंडळावर म्हणजेच अभ्यास मंडळाचा सदस्य, संपादक मंडळावर नसावा व दोन्ही मंडळाचे सदस्य परीक्षण मंडळात नसावेत.

Marathi Textbook Controversy
Goa Education: मराठी-कोकणी पाठ्यपुस्तकांचा वाद संपला! शिक्षण खात्याने घेतला विद्यार्थ्यांच्या हिताचा 'हा' मोठा निर्णय

...तर ही गंभीर बाब

गोवा राज्य शैक्षणिक अनुसंधान आणि शैक्षणिक परिषदेने (जीएससीईआरटी) तसेच अभ्यास मंडळानेही प्रशासकीय जबाबदारी पार पाडणे गरजेचे आहे. यापूर्वीही वेळोवेळी तत्कालीन राज्य शिक्षण संस्थेने (एसआयई) पाठ्यपुस्तक निर्मिती उत्कृष्टपणे पार पाडली आहे. परंतु इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत गेल्या सुमारे २५ वर्षांत नवीन पाठ्यपुस्तके तयार करण्यात आलीच नव्हती. त्यामुळेच नवीन पाठ्यपुस्तके प्रकाशित करणे ही चांगलीच बाब आहे. परंतु ह्या सगळ्याच प्रशासकीय पध्दतीला फाटा दिला असेल तर ती एक गंभीर बाब आहे. - पांडुरंग रावजी नाडकर्णी, शिक्षणतज्ज्ञ

एनईपी २०२० नुसार विद्यार्थ्यांचा भाषिक विकासाबरोबर सर्वांगीण विकास झाला पाहिजे. निवडलेल्या पाठ वा कवितेतून विद्यार्थ्यांत मूल्यशिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवता आले पाहिजे. साहित्याला प्रांताची वा भौगोलिक सीमांची कठोर बंधने नसावीत, तर त्यात एक सुंदर समतोल असावा. मुलाना ग्लोबल सिटीझन बनवायचे असेल तर पाठ्यपुस्तकातही स्थानिक ते जागतिक स्तरावरील लेखनाला स्थान मिळाले पाहिजे. -दीपक गावस, शिक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com