Goa Education: गोव्याचा स्थानिक वारसा आता अभ्यासक्रमात, NEP-अनुरूप पाठ्यपुस्तकांची सर्व वर्गांत अंमलबजावणी

NCERT Textbooks Revised Goa 2026-27: पाठ्यपुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख समजावी यासाठी राज्यातील एकमेव पारंपरिक ‘कावी’ चित्रकला शैली.
NCERT Textbooks Revised Goa 2026-27
Goa EducationDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) २०२० अन्वये सुधारित करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी)च्या पाठ्यपुस्तकांची राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व वर्गांमध्ये चालू शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून पूर्ण अंमलबजावणी करण्यात आली आहे.

प्राथमिक स्तरावरील ‘द वर्ल्ड अराउंड अस’ या सामाजिक शास्त्र विषयात गोव्याच्या स्थानिक इतिहास, संस्कृती आणि परंपरांचा समावेश करण्यात आल्याची माहिती शिक्षण क्षेत्रातील सूत्रांनी दिली.

माहितीनुसार, नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये विद्यार्थ्यांना गोव्याची वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक ओळख समजावी यासाठी राज्यातील एकमेव पारंपरिक ‘कावी’ चित्रकला शैली.

NCERT Textbooks Revised Goa 2026-27
Goa School Reopening: गोव्यातील शाळांच्या वेळेत आणि सुट्ट्यांमध्ये मोठा बदल? शिक्षण विभागाचा 'हा' नवा प्लॅन विचाराधीन!

गोव्याच्या नद्या, लोककला आणि लोकपरंपरा यांसारख्या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. स्थानिक संदर्भांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या परिसराशी अधिक जवळीक साधता येणार असून शिक्षण अधिक अर्थपूर्ण होण्यास मदत होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी आणि चौथीसाठी नव्या पाठ्यपुस्तकांची अंमलबजावणी करण्यात आली होती.

यंदा इयत्ता पहिली, दुसरी, पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीमध्येही सुधारित एनसीईआरटी पाठ्यपुस्तके लागू करण्यात आली आहेत. नवीन पाठ्यपुस्तकांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा बहुविषयक आणि कृतीआधारित दृष्टिकोन. विद्यार्थ्यांना केवळ पाठांतरावर भर न देता प्रत्यक्ष अनुभव, निरीक्षण आणि उपक्रमांच्या माध्यमातून शिकवण्यावर भर देण्यात आला आहे.

NCERT Textbooks Revised Goa 2026-27
Goa Education Department: गणवेश, रेनकोटसाठीचे 1,100 रुपये! 15 जुलैपर्यंत थेट खात्यांत; परिपत्रक जारी, 8 हजार विद्यार्थ्यांना होणार लाभ

‘कौशल्याधारित शिक्षण’वर भर

शिक्षण व्यवस्थेमध्ये आता ‘कौशल्याधारित शिक्षण’ आणि ‘क्षमताआधारित मूल्यमापन’ यांवर विशेष भर दिला जात आहे. त्यानुसार शिक्षकांना नव्या अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण देण्यासाठी एप्रिल महिन्यात इयत्ता सहावी ते आठवीच्या शिक्षकांसाठी विशेष ब्रिज कोर्स आयोजित करण्यात आला होता. याशिवाय जून महिन्यातही कृतीआधारित अध्यापन पद्धतींवर आधारित १५ दिवसांचे प्रशिक्षण सत्र सुरू आहे.

द्विभाषिक पाठ्यपुस्तके कायम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य देण्यात आले असले, तरी विद्यार्थ्यांना इतर भाषांचा परिचय व्हावा यालाही महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे गोव्यात प्राथमिक स्तरावर द्विभाषिक पाठ्यपुस्तके कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भाषिक विकासाला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचे सूत्रांचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com