

जगात मानसिक आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे. ‘जागतिक आरोग्य संघटने’च्या ताज्या आकडेवारीनुसार २०२३ मध्ये जवळजवळ १२० कोटी लोक, म्हणजे जवळजवळ प्रत्येक सात व्यक्तींपैकी एक व्यक्ती मानसिक विकारग्रस्त असल्याचे आढळले. भारतातही हा प्रश्न खूप गंभीर झाला आहे. आज (दहा ऑक्टोबर) ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ आहे. त्यानिमित्ताने भारतातील या समस्येचे स्वरूप, व्याप्ती आणि उपाययोजना यांविषयी.
उपचार न मिळण्याची कारणे
आर्थिक परिस्थितीच्या मर्यादा
साधने, सोयींची कमतरता
कलंकाची भीती
मनोविकाराची कारणे
१) सामाजिक परिस्थिती : वाढती विषमता, बेकारी, आर्थिक असुरक्षितता, युद्ध, पर्यावरणीय अरिष्टे, चंगळवाद, महासाथ, सामाजिक फूट आणि द्वेष. सायबर बुलिंग तसंच डिजिटल आणि सोशल मीडियाचा अतिवापर
२) आनुवंशिक, जौविक घटक : आनुवंशिकता, मेंदूची कार्यपद्धती आणि न्यूरो ट्रान्समीटर्सच्या कार्यपद्धतीतील बदल.
३) मानसिक घटक : एकटेपणा, लहानपणातले आघात, आत्मसन्मानाचा अभाव , झोपेचा अभाव आणि नकारात्मक विचार, असुरक्षितता, व्यसनं, नातेसंबंधांतील ताण
नैसर्गिक आपत्तींचाही परिणाम
पूर, दुष्काळ, वादळासारख्या नैसर्गिक आपत्तींनंतर चिंता, नैराश्य आणि आघातानंतरचा ताण यांसारख्या समस्या वाढतात. मोठ्या आपत्तींनंतर काही महिन्यांत सुमारे २० ते ३० टक्के लोकांमध्ये नैराश्य किंवा आघातानंतरचा ताण आढळतो.
चंगळवादी समाजव्यवस्थाही जबाबदार
मानसिक आरोग्यदिनाचे यंदाचे आशयसूत्र आहे, ‘‘Lived Experiences Heard: Real Voices, Real Change’’. रुग्णांचे अनुभव केवळ ऐकण्यासाठी नसतात. त्यांच्या अनुभवातून काय बदलायला हवं, सेवा कुठे अपुऱ्या पडतात, कोणते अडथळे आहेत आणि मानसिक आरोग्यव्यवस्था प्रत्यक्षात माणसांच्या गरजांना किती प्रतिसाद देते, हे समजू शकतं. मानसिक आरोग्याची धोरणं, सेवा आणि कार्यक्रम तयार करताना प्रत्यक्ष अनुभव असलेल्या व्यक्तींना सुरुवातीपासून सहभागी करणं आवश्यक आहे.
मानसिक आरोग्याविषयी निर्णय घेताना फक्त तज्ज्ञांनी काय सांगितलं हे पुरेसं नाही. ज्या व्यक्तींनी समस्या प्रत्यक्ष अनुभवल्या आहेत, उपचार घेतले आहेत, कलंक सहन केला आहे, सेवांपर्यंत पोहोचताना अडचणी अनुभवल्या आहेत किंवा बरे होण्याचा प्रवास केला आहे, त्यांच्या अनुभवांतही वेगळं आणि महत्त्वाचं ज्ञान असतं. आज मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात केवळ लोकांसाठी निर्णय घेणारी व्यवस्था नको आहे, तर लोकांसोबत निर्णय घेणारी व्यवस्था हवी आहे. ज्यांनी वेदना अनुभवल्या त्यांचा आवाज, ज्यांनी मदत मागितली आहे त्यांचा अनुभव, ज्यांना मदत मिळाली नाही त्यांची कहाणी; आणि ज्यांनी बरे होण्याचा प्रवास अनुभवला आहे, त्यांचं ज्ञान या सगळ्याला समान महत्त्व मिळायला हवं.
समानता, प्रेम, सहकार, माणुसकी आणि सद्भावना यांच्यावर आधारलेलं समाजजीवन निर्माण करण्यासाठी झटलं पाहिजे. त्याशिवाय मनोविकारांवर औषधं किंवा मानसोपचार घेणं म्हणजे हृदयविकारावर फक्त चिकटपट्टी लावल्यासारखंच होईल. आजची व्यवस्था आपल्याला सतत पैसा, प्रसिद्धी, गाड्या, बंगले, अमेरिका यांचेच स्वप्न रंगवते. कॉर्पोरेटचा माल खपावा म्हणून जाहिरातींचा भडिमार करून मोबाईल फोन, मोटारगाड्या, टीव्ही, कॉस्मेटिक्स, जंक फूड अशा गरज नसलेल्या वस्तू आपलं स्टेटस राखण्याकरता घ्यायला लावते.
त्यामुळे जीडीपी वाढतो; पण त्याचबरोबर कार्बन फूटप्रिंट वाढतं आणि पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पूर, दुष्काळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्ती, स्थूलपणा, रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार अशा शारीरिक समस्या तर होतातच; पण त्याचबरोबर नैराश्य, चिंता, भीती असे मानसिक विकारही वाढतात.
म्हणून चंगळवादी समाजव्यवस्था नाकारायला हवी. मात्र तोपर्यंत मानसिक आरोग्याच्या समस्या हाताळण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, थेरपिस्ट्स, रुग्णालय, खाटा, परिचारिका व इतर प्रशिक्षित मनुष्यबळाची तीव्र गरज आहे. देशात दर लाख लोकसंख्येमागे मानसोपचारतज्ज्ञांचे प्रमाण एक एवढेही नाही.
अच्युत गोडबोले, सायली कुलकर्णी, मानसशास्त्राचे अभ्यासक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.