खाद्यतेल पुन्हा-पुन्हा वापराल तर... आरोग्याला मोठा धोका!

Goa Used Cooking Oil Disposal:स्वयंपाकाच्या तेलातील ‘टोटल पोलर कंपाऊंड्स’ (टीपीसी) २५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास ते तेल वापरणे धोकादायक मानले जाते.
Goa Used Cooking Oil Disposal
Goa Used Cooking Oil DisposalDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात वापरलेल्या खाद्यतेलाच्या (यूसीओ) योग्य विल्हेवाटीचा प्रश्न गंभीर बनला आहे. हॉटेल, उपाहारगृहे आणि मोठ्या स्वयंपाकगृहांतून निर्माण होणारे तेल व ग्रीस अनेकदा गटारात सोडले जाते किंवा पुन्हा अन्नपदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते. त्यामुळे सार्वजनिक आरोग्याबरोबरच पर्यावरणालाही धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर वापरलेल्या तेलाचे संकलन, तपासणी आणि पुनर्वापरासाठी प्रस्तावित नियामक चौकट मांडण्यात आली आहे.

स्वयंपाकाच्या तेलातील ‘टोटल पोलर कंपाऊंड्स’ (टीपीसी) २५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास ते तेल वापरणे धोकादायक मानले जाते. त्यामुळे नियमित टीपीसी तपासणी, डिजिटल नोंदी, अधिकृत संकलन व्यवस्था आणि ‘क्यूआर कोड’द्वारे तेलाच्या विल्हेवाटीचा मागोवा घेण्याची व्यवस्था प्रस्तावित आहे. यामुळे दूषित तेल पुन्हा अन्नसाखळीत जाणे रोखण्यास मदत होईल.

Goa Used Cooking Oil Disposal
FDA Raid: वेर्णा, नागोवा येथे 12 आस्थापनांची तपासणी, 8 उपाहारगृहांना स्वच्छतेबाबत नोटिसा; दोन आस्थापने विनापरवाना

‘ग्रीस ट्रॅप’ची नियमित स्वच्छता, अधिकृत सेवा पुरवठादारांकडूनच कचऱ्याची विल्हेवाट, किमान तीन वर्षे डिजिटल नोंदी जतन करणे आणि नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई अशा उपाययोजनांवर भर देण्यात आला आहे. नव्या कायद्याची गरज नसून विद्यमान पर्यावरण आणि जलप्रदूषण कायद्यांतर्गत अंमलबजावणी शक्य असल्याचा दावा सरकारने केला आहे.डिजिटल नोंदी

 प्रत्येक स्वच्छतेची नोंद.तारीख व प्रमाण नोंदवणे.सेवा पुरवठादाराची माहिती. डिजिटल प्रणालीचा वापर.तपासणी सुलभ होते.दूषित तेलाचे धोके हृदयविकाराचा धोका. उच्च रक्तदाबाची शक्यता. रक्तवाहिन्यांचे नुकसान. विषारी घटक तयार होतात. सार्वजनिक आरोग्यावर परिणाम.

Goa Used Cooking Oil Disposal
Refrigerator Cleaning Tips: फ्रिज साफ करायचा कंटाळा आलाय? 5 मिनिटांत होईल चकाचक, वापरा या सोप्या ट्रिक्स!

‘क्यूआर’ आधारित व्यवस्था प्रत्येक ‘यूसीओ’ची नोंद.संकलनाचा मागोवा.अधिकृत वाहतूक.

पुनर्वापराची खात्री.पारदर्शकता वाढते.यूसीओ म्हणजे काय?वापरून झालेले खाद्यतेल म्हणजे ‘यूसीओ’.हे तेल पुन्हा स्वयंपाकासाठी वापरणे धोकादायक.योग्य संकलन आवश्यक.बायोडिझेल निर्मितीसाठी उपयोग होऊ शकतो.पर्यावरण संरक्षणालाही मदत.

‘ग्रीस ट्रॅप’ची स्वच्छता नियमित साफसफाई आवश्यक.घनकचरा वेगळा काढावा.

तेल स्वतंत्र संकलित करावे.गाळाची योग्य विल्हेवाट लावावी.स्वच्छता नोंदी ठेवाव्यात.टीपीसी म्हणजे काय?तेलाची गुणवत्ता मोजणारा निकष.तेल किती खराब झाले हे दर्शवते.२५% ही महत्त्वाची मर्यादा.त्यापुढे तेल बदलणे आवश्यक.आरोग्य सुरक्षेसाठी महत्त्वाचे.

Goa Used Cooking Oil Disposal
आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

तपासणी मोहीम उच्च वापराच्या स्वयंपाकगृहांवर भर.हातातील टीपीसी मीटर.डिजिटल अहवाल.जोखीम आधारित तपासणी.नियमित निरीक्षण.बायोडिझेल निर्मिती

 वापरलेल्या तेलाचा पुनर्वापर.इंधन निर्मिती.कार्बन उत्सर्जन घटते.हरित ऊर्जेला चालना.परिपत्र अर्थव्यवस्थेला बळ.

ग्रीस ट्रॅप का आवश्यक?

 तेल गटारात जाण्यापासून प्रतिबंध.

 सांडपाणी व्यवस्था सुरक्षित राहते.

 दुर्गंधी कमी होते.

 अडथळे टळतात.

 पर्यावरणाचे संरक्षण.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com