Rahul Gandhi: भाजपविरोधी असलेले वातावरण टिकवा आणि तीव्र करा; राहुल गांधी

Goa Congress: गोव्यातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, प्रभारी माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती
Goa Congress: गोव्यातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, प्रभारी माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती
Amit Patkar, Manikrao ThakareDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भाजपविरोधी असलेले वातावरण टिकवून ठेवण्याबरोबर ते अधिक तीव्र करण्याच्या सूचना काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिल्लीत झालेल्या बैठकीत विविध राज्यांतील प्रदेशाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस तसेच प्रभारींना दिल्या आहेत. त्यामुळे गोव्यातही आता काँग्रेसला भाजपविरोधी आंदोलन छेडावे लागणार आहे.

या बैठकीस काँग्रेसचे अध्यक्ष मल्लीकार्जुन खरगे यांच्यासह पक्षचे प्रमुख नेते उपस्थित होते. गोव्यातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, प्रभारी माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती.

या बैठकीत महाराष्ट्रात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांनतर काही कालावधीत विविध राज्यांच्या निवडणुकाही होणार आहेत. त्यामुळे भाजपविरोधी असलेले वातावरण अधिक तीव्र झाले पाहिजे.

Goa Congress: गोव्यातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, प्रभारी माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती
Goa Congress: कंपन्यांच्या वसुलीकडे भाजप सरकारचे दुर्लक्ष; सर्वसामान्यांना मात्र त्रास

यासाठी भाजपचे अदानीप्रेम, सेबीचा गैरवापर, असे प्रमुख मुद्दे व स्थानिक मुद्दे घेऊऩ जनतेत गेले पाहिजे, अशा सूचना करण्यात आल्या. मुख्यत्वे राहुल गांधी यांनी सर्व प्रदेशाध्यक्षांना आक्रमक भूमिका घेण्यास सांगितल्याची माहिती हाती आली आहे.

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी या बैठकीची छायाचित्रे समाजमाध्यमांत पोस्ट केली.राज्यात काँग्रेसकडून भाजपच्या कारभारावर टीका होते तरी म्हणावे तसे आंदोलन होत नाही, असेही जनतेत मत बनले आहे. हे मत बदलण्यासाठी काँग्रेसला केंद्रीय नेत्यांच्या सूचना अंमलात आणाव्या लागणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Amit Patkar teachers salary issue
Black And White Podcast With Amit Patkar
Goa Congress Core Committee
Rahul Gandhi FIR Protest Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com