Kosambi: कोसंबी आणि आजची शिक्षणपद्धती

D D Kosambi: आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स (एआय) चा वापर करून स्वतःला आंतरशाखीय विद्वान समजणे म्हणजे बहुरूपी बनून सामान्य लोकांना टोपी घालण्यासारखे आहे.
D D Kosambi
KosambiDainik Gomantak
Published on
Updated on

डॉ. नाऊ वरक

आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स (एआय) चा वापर करून स्वतःला आंतरशाखीय विद्वान समजणे म्हणजे बहुरूपी बनून सामान्य लोकांना टोपी घालण्यासारखे आहे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास तसेच त्याचा आंतरशाखीय व बहुशाखीय आवाका समजून घेणे डी. डी. कोसंबींच्या शिक्षणपद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य होते.

ज्यांनी एकाही विषयाचा सखोल अभ्यास केलेला नाही, असे लोक अचानक आंतरशाखीय (इंटरडिसिप्लिनरी) किंवा बहुविद्याशाखीय (मल्टीडिसिप्लिनरी) शिक्षणाचे स्वयंघोषित प्रचारक होताना दिसतात. वैद्यकीय चिकीत्सक नसतानाही वैद्यकीय सल्ले देणाऱ्या ‘रिल्सस्टार्स’प्रमाणे या पोकळ आंतरशाखावाद्यांचे स्तोम माजले आहे. आंतरशाखीय किंवा बहुविद्याशाखीय अभ्यास हा प्रत्येक विषयाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण आहे, यात वादच नाही.

D D Kosambi
Goa Degree Admission: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! 12 मे पासून पदवी प्रवेशाची दुसरी फेरी; 'या' पोर्टलवर करता येणार नोंदणी

मात्र एखाद्या विषयाला मूळच (एपिस्टेमॉलॉजी) नसून सगळेच सामान्यज्ञान (जनरल नॉलेज) आहे, या अविर्भावात आंतरशाखीय अभ्यासाचा प्रचार हितावह नाही. एआयचा वापर करून स्वतःला आंतरशाखीय विद्वान समजणे म्हणजे बहुरूपी बनून सामान्य लोकांना टोपी घालण्यासारखे आहे. प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास तसेच त्याचा आंतरशाखीय व बहुशाखीय आवाका समजून घेणे डी. डी. कोसंबींच्या शिक्षणपद्धतीचे मुख्य वैशिष्ट्य होते.

उदाहरण द्यायचे म्हटल्यास पूर्वी स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी करण्यासाठी बरेच विद्यार्थी दिल्लीला जायचे. पहिल्या व दुसऱ्या प्रयत्नात यश न मिळाल्यास वसतिगृहाखातर जवाहरलाल नेहरू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संबंध या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचे. यूपीएससीची परीक्षा पास न झाल्यास मग एशियन किंवा रशियन विषयात पीएचडी मिळवून ‘जेएनयू’ या ब्रॅण्डच्या नावावर देशातील विद्यापीठांमध्ये नोकरी मिळवायचे. ‘जेएनयू’मधील चळवळ, चिकित्सक विचार व संशोधन याच्याशी त्यांचा फारसा संबंध नसायचा.

D D Kosambi
Goa Education: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! गोव्यात लागू होणार ‘त्रिसूत्री भाषा’ पद्धत; ‘नापास नाही’ पद्धत राहणार कायम

ते सामान्यज्ञानालाच संशोधन मानायचे. विविध विषयांचे सामान्यज्ञान म्हणजेच आंतरशाखीय अभ्यास, अशी अंधश्रद्धा त्यांच्यात रूढ होई. म्हणून कोसंबींचे आंतरशाखीय संशोधन आणि सामान्यज्ञानाचा मुकूट घातलेले स्वयंघोषित ‘इंटरडिसिप्लिनरी’ लोक यांत फरक आहे. गोव्यात ३१ जुलै, १९०७ रोजी उच्चशिक्षित घरात जन्म झालेल्या कोसंबी यांचे प्राथमिक शिक्षण पुण्यात, माध्यमिक शिक्षण केम्ब्रिज, मॅसेच्युसेट्स येथे, तर अमेरिकेतील हार्वर्ड विद्यापीठातून त्यांनी पदवी प्राप्त केली.

त्यांचे वडील धर्मानंद कोसंबी हे पाली व संस्कृतचे तज्ञ होते व हार्वर्ड विद्यापीठात तत्वज्ञानाचे प्राध्यापक होते. वडिलांप्रमाणेच बालपणापासूनच कोसंबी विविध विषयांकडे आंतरशाखीय चिकित्सकतेने पाहायचे. याच जाणिवेतून कोसंबींनी पदवीसाठी गणितासह इतिहास, जर्मन, सामरिकशास्त्र व इंग्रजी हे विषय निवडले. आजपर्यंत भारतात सामाजिक विज्ञानात मोडणारे समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, भूगोल, भाषा इत्यादी विषय हे मूलतः आंतरशाखीय आणि बहुशाखीय आहेत, याची कोणाला गणतीच नाही.

D D Kosambi
Teachers Extra Work: शिक्षकांवर जनगणना कामाचा बोजा! शैक्षणिक कामकाजावर परिणाम होण्‍याची भीती; वर्तुळातून नाराजी व्यक्त

विज्ञान या विषयाला सोयीस्करपणे वेगळे करून सामाजिक विज्ञानाला दुय्यम लेखले गेले. याचे प्रमुख कारण म्हणजे विज्ञान शाखेत वळविला जाणारा आर्थिक निधी. विज्ञान संशोधनापेक्षा आर्थिक निधीमुळे लोकप्रिय आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोसंबींसाठी पुराभिलेखांतील दस्तऐवजांचा अनुवाद हे दुभाषाचे काम, इतिहासकाराचे नव्हे. पुराभिलेख हे इतिहासाचा विपर्यास असून प्रस्थापित समाजाने निर्माण केलेले स्वतःचे आर्थिक भांडवल असते, असे कोसंबींना वाटायचे.

इतिहासकार हा वैज्ञानिक असतो. तो इतिहासाच्या एकाच स्रोतावर हातोडा मारत नसतो. पुरातत्व अवशेष, नाणी, भाषा, चालीरीती, धातूंची हत्यारे, जीवाष्म असे इतिहासाचे अनेक स्रोत असतात. ‘एआय’वर उत्तरे शोधणारे खरेच आंतरशाखीय वा बहुशाखीय अभ्यासपद्धत जपतील का? प्रख्यात वैज्ञानिकाला लाजवतील असे ‘एआय’रचित निबंध आज विद्यार्थी भीड न बाळगता सादर करतात व आपणच मूळ लेखक असल्याचे सांगतात. शब्द ‘एआय’चे व विचार लेखकाचे, असे नवे तर्क ‘एआय’चे व्यावसायिक समाजात पेरतात.

D D Kosambi
Goa Agricultural College: अभिमानास्पद! गोवा कृषी महाविद्यालयाला ICAR ची अधिमान्यता, मिळणार राष्ट्रीय दर्जाचे शिक्षण

काही मंडळी शिक्षणापेक्षा ‘एआय’चे विक्रेते असल्यागत वागतात. ‘एआय’ व्यवसायात अमेरिका व चीन हे देश अग्रेसर आहेत आणि आम्ही त्यांचे ग्राहक. आज भारतीय ज्ञान प्रणालीचा अभिमान बाळगणारे स्कोपस आणि वेब ऑफ सायन्स या अमेरिकी आणि ब्रिटिश डिजिटल रिपॉझिटरीमध्ये लेख प्रकाशित झाल्यावरच धन्यता मानतात. प्रश्न असा आहे खरेच कोसंबींचे वैज्ञानिक विचारविश्व एल्सिव्हियर व क्लॅरिव्हेट सारख्या अमेरिकी कंपन्यांनी त्यावेळी छापले असते का?

समाजोपयोगी संशोधनापेक्षा शोधनिबंधाचा कितीजणांनी त्यांच्या लिखाणात उल्लेख केला यावर आता वैज्ञानिकत्व ठरते. ‘इंटरडिसिप्लिनरी’ ही पद्धत आहे, पदवी नाही. भांडवलशाहीचे विरोधक कोसंबी मार्क्सवादाचे समर्थक होते. टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई येथे कार्यरत असताना ऊर्जा या विषयावार कोसंबी आणि होमी भाभा यांच्यामध्ये मतभेद झाले. भाभा अणूऊर्जेचे समर्थक होते तर कोसंबी सौर ऊर्जेचे.

D D Kosambi
Goa Degree Admission: विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! 12 मे पासून पदवी प्रवेशाची दुसरी फेरी; 'या' पोर्टलवर करता येणार नोंदणी

अणुउर्जेमुळे जगात जीवसृष्टीला धोका निर्माण होईल, असे कोसंबींना वाटे. मात्र मार्क्सवादाचा ठपका ठेऊन त्यांचे विज्ञान दाबण्याचे राजकीय प्रयत्न झाले. त्यांच्या तत्वज्ञानाची भांडवलशाही वैज्ञानिकांनी खिल्ली उडवली. आज कोसंबींच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास ‘एआय’,‘स्कोपस’ हे कोसंबींसाठी नववसाहतवादाची नांदीच वाटली असती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com