

पणजी: राज्य सरकारने एला फार्म जुने गोवे येथे सुरू केलेल्या गोवा कृषी महाविद्यालयाला भारतीय कृषी संशोधन परिषदेने (आयसीएआर) अधिमान्यता दिली आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश कुंकळकर यांनी ही माहिती दिली.
डॉ. कुंकळकर यांनी अधिमान्यतेच्या प्रमाणपत्रासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. गोविंद परब, कृषी सचिव अर्जुन मोहन, कृषी संचालक संदीप फळदेसाई उपस्थित होते. या महाविद्यालयाचे उद्घाटन २७ सप्टेंबर २०२२ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले होते.
राज्यातील ते पहिले सरकारी कृषी महाविद्यालय असून, गोवा विद्यापीठाशी संलग्न आहे. गोवा तसेच इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कृषी शिक्षण प्रदान करणे हा या महाविद्यालयाचा मुख्य उद्देश आहे. दरम्यान, महाविद्यालय चार वर्षांचा बीएससी (हॉनर्स) अभ्यासक्रम चालवते, जो भारतीय कृषी संशोधन परिषदेद्वारे प्रस्तावित पाचवे व सहावे डीन यांचे अभ्यासक्रम अंगीकारतो.
प्रवेशासाठी बारावीनंतर विज्ञान शाखेत किमान ५० टक्के गुण आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांना १२ विभागांमध्ये प्रशिक्षण दिले जाते, जसे की अॅग्रोनोमी, कृषी अर्थशास्त्र, कृषी सांख्यिकी, कृषी विस्तार, कीटकशास्त्रज्ञ, जनुकशास्त्र व वनस्पती सुधारणा, बागायतशास्त्र, मृदा शास्त्र व कृषी रसायनशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, कृषी अभियांत्रण, प्राणिशास्त्र व दुग्धशास्त्र. एकूण १८० क्रेडिट तास पूर्ण करणे अनिवार्य आहेत. दरवर्षी ६० विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.