लोकशाही की हुकूमशाही? पक्ष, उमेदवार आणि निवडणुकीतील कोट्यवधींच्या वसुलीची साखळी; संसदेत पोहोचणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर मोठा प्रहार

Corruption In Indian Politics: आपल्‍या देशात तरुणांची स्‍वतंत्र अशी चळवळ अस्‍तित्‍वात नाही, तो फक्त वापरला जाताे. पण त्‍याच्‍यासाठी कोणी जगताना अगर योजना आखताना दिसत नाही.
Corruption In Indian Politics
Corruption In Indian PoliticsDainik Gomantak
Published on
Updated on

- सुदेश मळकर्णेकर

आपल्‍या देशात तरुणांची स्‍वतंत्र अशी चळवळ अस्‍तित्‍वात नाही, तो फक्त वापरला जाताे. पण त्‍याच्‍यासाठी कोणी जगताना अगर योजना आखताना दिसत नाही. म्‍हणून पक्ष, पंथ व संप्रदाय निरपेक्ष युवकांची संघटना ही या काळाची गरज आहे.

देशाचे राजकारण समाजकारण व अर्थकारण या साऱ्यांवर लाचलुचपतीचा परिणाम झाला आहे. राजकारणाचे गुन्‍हेगारीकरण झाले आहे. राष्‍ट्राच्‍या संसदेपासून विधानसभेपर्यंतची उमेदवारांची निवड करताना पैसा, मनगटाची ताकद, जातीय शक्‍ती किंवा या सगळ्‍याचा एकत्रित विचार राजकीय पक्ष करतात. शिक्षण, पावित्र्य, सचोटी आणि जनसेवा यांचे निष्‍कर्ष क्‍वचितच अशा निवडीच्‍यावेळी वापरले जातात.

Corruption In Indian Politics
Goa Municipal Corruption: मडगाव पालिकेच्या कचरा निविदेत 6 कोटी 53 लाखांचा घोटाळा? सावियो कुतिन्हो यांची पोलिसांत धाव! सखोल चौकशी करुन गुन्हा नोंदवण्याची काँग्रेसची मागणी

निवडणुकीसाठी उमेदवारांना प्रचंड रक्‍कम खर्च करावी लागते. निवडणूक आयोगाने खर्चाची मर्यादा ठेवली असताना प्रत्‍यक्ष उमेदवार यापेक्षा कितीतरी पटीने जास्‍ती खर्च करतो. चुरशीच्‍या लढतीत ही रक्‍कम काही कोटी असू शकते. एवढा पैसा येतो कुठून?

नंतर या ना त्‍या मार्गाने ते ज्‍याच्‍याकडून वसूल करण्‍याची अपेक्षा असते त्‍याच्‍याकडूनच ही रक्‍कम मिळते.

निवडणूक जिंकल्‍यावर जे मंत्री होतात ते आपली निर्णयशक्‍ती जास्‍तीत जास्‍त घबाड देणाऱ्या कंत्राटात स्‍वत:साठी व पूर्वीच्‍या आर्थिक सहाय्‍य करणाऱ्यासाठी वापरतात. बाकीचे सत्तेचे दलाल होतात. भारताच्‍या संसदीय लोकशाहीतील भ्रष्‍टाचारासाठी पोषक आहे.

देशाच्‍या विकासासाठी जात-पात आणि पंथ जुगारून देऊन जाती जमातीपासून अलिप्‍त असलेला तरुणवर्ग निर्माण व्‍हावा लागेल.

Corruption In Indian Politics
Goa Police Corruption: पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीची तक्रार; खोटा गुन्हा दाखल करण्याचाही केला प्रयत्न

आपल्‍या देेशाची अडचण ही आहे, की या देेशात अगदी सनातन काळापासून कधीच एक-दुसऱ्याच्‍या साेबत जगलो नाही. माणसाचा स्‍पर्शही हा संसर्ग मानला गेला. परिणामी सामाजिक मूल्‍यांचे बीजारोपण होऊ शकले नाही. कालांतराने समतेसाठी आरक्षणाची गरज निर्माण झाली आणि हे आरक्षण वरदान नसल्याचा आता शोध लागत आहे. एका पिढीला आरक्षण दिले की, त्‍यांच्‍या पुढच्‍या पिढीला आरक्षण नाही दिले गेले पाहिजे.

आरक्षण घेणाऱ्यांनीच आता ते नाकारले पाहिजे. जातीपातीऐवजी आर्थिकदृष्‍ट्या मागासांना आरक्षण दिले जाणे गरजेचे आहे.सर्वांनी एका प्रवाहात सामील झाल्‍याशिवाय एकसंघ समाज निर्माण होऊच शकत नाही.आज प्रत्‍येक राजकीय पक्षाला युवक आणि विद्यार्थी आपल्‍यासोबत असावा असे वाटते. असा एक सार्वत्रिक समज आहे की, आपले डोके न वापरता इतरांच्‍या मर्जीनुसार वागेल, असा युवक आणि विद्यार्थी या सारखा स्‍फोटकवर्ग नाही.

Corruption In Indian Politics
Goa Job Scam: 'GMC'मध्ये नोकरीचं स्वप्न दाखवलं अन् तिघांना लुबाडलं; फोंडा पोलिसांकडून डिचोलीतील संशयिताला बेड्या

त्‍यामुळे सर्व क्षेत्रातील पुढारी अगर दलाल युवकांचे साधन म्‍हणून उपयोग करून घेत आहेत. आपल्‍या देशात तरुणांची स्‍वतंत्र अशी चळवळ अस्‍तित्‍वात नाही, तो फक्त वापरला जाताे. पण त्‍याच्‍यासाठी कोणी जगताना अगर योजना आखताना दिसत नाही. म्‍हणून पक्ष, पंथ व संप्रदाय निरपेक्ष युवकांची संघटना ही या काळाची गरज आहे. इतिहासात जे घडत नाही, हे घडू शकत नव्‍हते घडवून आणता येते.

अशी आकांक्षा बाळगून जे तरुण इतिहास घडवीत असतात तेच वर्तमानही घडवीत असतात. यालाच आपण आस्‍तिकदृष्‍टी म्‍हणतो. एकूण काय अन्‍याय सहन करण्‍याची क्षमता व या क्षमतेतील तफावत यावर दोन पिढ्यांमधील अंतर अवलंबून आहे. समाजातील धार्मिक, आर्थिक, सामाजिक अन्‍यायाविरुद्ध बंड करून उठतो, तो खरा तरुण. अगर बंडखोरी कृतीमागे क्रांतीची विधायक आकांक्षा असावयास हवी.

Corruption In Indian Politics
Corruption In Goa: गोव्यात भ्रष्टाचारविरोधात कडक पावले! 5 वर्षांत 2291 तक्रारी; 296 सरकारी कर्मचारी निलंबित

लोकशाही मूल्‍ये, सामाजिक क्षमता, स्‍वातंत्र्य यावरील अढळ श्रद्धा आणि अन्‍यायाविरुद्ध आपले जीव ओवाळून टाकण्‍याची तयारी करणारी तरुण पिढीच क्रांती घडवू शकते. समता हा चळवळीचा प्राण असावा लागताे. आपला मुलगा जगदग्‍नीची आज्ञा ऐकून रेणुकाची गर्दन छाटणारा परशुराम व्‍हावा, की अन्‍यायाच्‍या प्रतिकारासाठी सख्ख्‍या बापाशी बंड करून उठणारा प्रल्‍हाद हवा हे आपणास कधी तरी ठरवावे लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com