

मडगाव: मडगाव पालिकेच्या घरोघरी कचरा गोळा करण्याच्या निविदा प्रक्रियेत घोटाळा झाल्याचा आरोप करत मडगाव गट काँग्रेसचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी मडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार सर्वांवर गुन्हा नोंद करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.पालिकेकडून सार्वजनिक निधीतील सुमारे ६ कोटी ५३ लाख रुपयांचा गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी मधू नार्वेकर तसेच नगरसेवक दामोदर वरक, कायद्याची पायमल्ली.
पालिकेच्या कार्यपद्धतीत कायद्याची पायमल्ली होत असल्याचा आरोप करत पालिका संचालनालयाने या ठरावावर स्थगिती आणावी, अशी मागणी त्यांनी केली. सत्ताधारी भाजपच्या पालिका मंडळाकडून सातत्याने घोटाळे होत असल्याने पोलिस तक्रार दाखल करावी लागली, असेही कुतिन्हो यांनी सांगितले. हे प्रकरण लोकायुक्तांकडेही नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कामिल बारेटो, महेश आमोणकर आणि लत्ता पेडणेकर यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्याची माहिती कुतिन्हो यांनी दिली. ३० मार्च रोजी झालेल्या पालिका बैठकीत घरोघरी कचरा गोळा करण्याच्या कंत्राटासंदर्भात अनेक नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. पालिका मंडळाची मुदत लवकरच संपत असल्याने नवीन मंडळ अस्तित्वात आल्यानंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. तसेच नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांनी हा विषय रद्द करण्यात येत असल्याचेही जाहीर केले होते, असे कुतिन्हो यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.