Goa Job Scam: 'GMC'मध्ये नोकरीचं स्वप्न दाखवलं अन् तिघांना लुबाडलं; फोंडा पोलिसांकडून डिचोलीतील संशयिताला बेड्या

Goa GMC job scam: गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) बांबोळी येथे सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालणाऱ्या एका संशयिताला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे.
Goa GMC job scam
Goa GMC job scamDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गोवा वैद्यकीय महाविद्यालय (GMC) बांबोळी येथे सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा घालणाऱ्या एका संशयिताला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. सुभाष सीताराम नाईक (रा. पाळी, डिचोली) असे या संशयिताचे नाव असून, त्याने नोकरीचे आमिष दाखवून तिघांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या कारवाईमुळे सरकारी नोकरीच्या नावाखाली सुरू असलेल्या रॅकेटचा पुन्हा एकदा पर्दाफाश झाला आहे.

सरकारी नोकरीच्या नावाखाली वसुली

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सुभाष नाईक याने बांबोळी येथील 'जीएमसी'मध्ये नोकरी मिळवून देतो, असे सांगून तीन व्यक्तींचा विश्वास संपादन केला होता. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी काही रक्कम खर्च करावी लागेल, असे सांगून त्याने पीडितांकडून मोठी रक्कम वसूल केली. मात्र, पैसे देऊन बराच काळ उलटल्यानंतरही कोणालाही नोकरी मिळाली नाही. संशयिताकडून केवळ आश्वासने मिळत असल्याने पीडितांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.

Goa GMC job scam
Goa Agriculture: 'फळांच्या राजा'चा यंदा 'गोडवा' अधिक; उत्पादनात वाढ, काजू पीकही गेल्या वर्षांच्या तुलनेत समाधानकारक

फोंडा पोलिसांची धडक कारवाई

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्रस्त पीडितांनी फोंडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास चक्रा फिरवली आणि संशयित सुभाष नाईकला डिचोलीतून ताब्यात घेतले.

या प्रकरणात आणखी किती जणांची फसवणूक झाली आहे आणि या मागे मोठे रॅकेट आहे का, याचा तपास आता पोलीस करत आहेत.

Goa GMC job scam
Goa Police Corruption: पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध लाचखोरीची तक्रार; खोटा गुन्हा दाखल करण्याचाही केला प्रयत्न

सरकारी नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली गोव्यात गेल्या काही महिन्यांत अनेक फसवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. कोणत्याही अधिकृत भरती प्रक्रियेविना पैसे देऊन नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करणे धोक्याचे ठरू शकते, असे आवाहन वेळोवेळी पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com