Goa Toolkit Controversy: आत्मपरीक्षणाचे ‘टुलकिट’ हवे

Goa Politics: शेजाऱ्यापाजाऱ्यांनी ‘कुजबुज’ सुरू केल्यानंतर आपला बाब्या वा बेबी संस्कारीच आहे, असा पालकांचा बनलेला अढळ विश्वास कुठेतरी डळमळीत होतो.
Goa Toolkit Controversy: आत्मपरीक्षणाचे ‘टुलकिट’ हवे
Goa ToolkitDainik Gomantak
Published on
Updated on

शेजाऱ्यापाजाऱ्यांनी ‘कुजबुज’ सुरू केल्यानंतर आपला बाब्या वा बेबी संस्कारीच आहे, असा पालकांचा बनलेला अढळ विश्वास कुठेतरी डळमळीत होतो. त्यामुळे किमान शहानिशा करण्याची गरज भासू लागते. गोव्याच्या पर्यटन क्षेत्राची गत संस्कारी पाल्यासारखी झाली आहे. देश-विदेशात अफाट लोकप्रियता लाभलेल्या गोव्याला प्रसिद्धीचे अढळ ‘कोंदण’ लाभले; परंतु गोवा गेले तीन महिने चर्चेत राहिला तो समाजमाध्यमांवर चाललेल्या एका ‘नकारात्मक’ मोहिमेमुळे. ‘गोव्यातील पर्यटन घटले’, असा ‘इन्फ्यूएन्सर’कडून सातत्याने घोषा सुरू राहिला.

देशभरात चर्चा होऊ लागली. सरकारने नाकारले तरी त्याचे दृश्य परिणाम गोव्याला सासावे लागत आहेत. आता वर्षारंभाची नवलाई सरल्यावर मंत्रिमंडळ बैठकीत या परिस्थितीवर चिंता व्यक्त करण्यात आली. ‘टूलकिट’द्वारे गोव्याविषयी बाहेरील राज्यांत बदनामी केली जात आहे, असा मुद्दा मांडण्यात आला. या ‘टूलकिट’चे मूळ शोधण्यासोबत काही स्वकीय ‘इन्फ्लूएन्सर’ना फूस लावत आहेत का, हे पडताळण्याची गरज व्यक्त झाली. पर्यटन क्षेत्रातील घटकांची एक बैठकही होणार आहे. इथे लक्षात घ्यायला हवे, पर्यटन क्षेत्राला उतरती कळा लागली आहे, हे मान्य करून आत्मपरीक्षण केले तरच ‘देर आए, दुरुस्त आए’! स्वार्थासाठी वास्तव लपवून केवळ ‘टूलकिट’च्या नावाने शंखनाद करून फारसे काही हाती लागणार नाही.

Goa Toolkit Controversy: आत्मपरीक्षणाचे ‘टुलकिट’ हवे
Goa Politics: 'ही टीका नसून आश्वासनांची आठवण', मुख्यमंत्र्याच्या तंबीनंतर काब्रालांनी दिले स्पष्टीकरण

‘टूलकिट’ हा शब्द अलीकडच्या काळात विशेषतः सामाजिक आणि राजकीय चळवळींच्या अनुषंगाने प्रकाशात आला आहे. टूलकिट म्हणजे रणनीती, मार्गदर्शक तत्त्वे आणि कृतींचा संच, ज्याचा उपयोग मोहिमा किंवा आंदोलन आयोजित करण्यासाठी किंवा सामाजिक माध्यमांवर ठरावीक अजेंडा राबविण्यासाठी होतो. हे दुधारी हत्यार. त्याद्वारे गोव्याच्या बदनामीचा विडा कुणीतरी उचलला असावा, यात तथ्य वाटते. गोव्यातील पर्यटनासंदर्भात सोईची व निवडक छायाचित्रे, दृकश्राव्य तुकडे प्रसारित करून अर्धसत्य मांडले गेले. बँक बुडल्याची आवई उठल्यावर खातेदार चलबिचल होतात, त्याचप्रमाणे गोवन लोकप्रियतेच्या ‘व्ह्यूव्ज’ लाटांवर आरूढ होणाऱ्या ‘इन्फ्युएन्सर’मुळे देशभर गोव्यातील पर्यटनाविषयी चर्वितचर्वण सुरू झाले.

अर्थात अशा टीकेमुळे आम्हास आत्मभान आले तरी पुरे! शॅकचालकांकडून पर्यटकांवर दोनदा झालेले खुनी हल्ले किनारी भागांत माजलेल्या अराजकतेची साक्ष देतात. ही स्थिती बदलण्यासाठी आपण काय करणार, हा प्रश्न आहे. २०१७पासून देशी पर्यटकांचा ओघ वाढला असला तरी अफाट खर्च करणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या रोडावली. आठ वर्षांपूर्वी विदेशी पर्यटकांची नऊ लाख असलेली संख्या पावणेतीन लाखांवर येऊन ठेपली.

Goa Toolkit Controversy: आत्मपरीक्षणाचे ‘टुलकिट’ हवे
Goa Politics: दोन आर्लेकरांच्या 'राजकीय नाट्या'मध्ये मुख्यमंत्र्यांची खुर्ची भक्कम! सोबत 'सनबर्न' विरोध मावळल्याची चर्चा

२०१८च्या सुमारास ८६६ चार्टर विमाने गोव्यात (Goa) आली, तो आकडा २०२४च्या सप्टेंबरपर्यंत १६०वर विसावला. क्रूझ ३५ ते ४० येत, ती संख्या १५ ते २० वर थांबली. देशी पर्यटकांचा आकडा समाधानकारक असल्याचा सरकारने दावा केला तरी विदेशी पर्यटकांसोबत तुलना होऊ शकत नाही. परदेशी पर्यटक बराच काळ वास्तव्य करतो, तो सढळहस्ते खर्च करतो. विदेशी पर्यटकांची संख्या घटणे ही समस्या केवळ गोव्यापुरती सीमित नाही, देशपातळीवर अपवाद वगळता ती सर्वत्र आढळते. त्यावर उपाय काढण्याची जबाबदारी राज्यासोबत केंद्राचीदेखील आहे. परदेशी पाहुण्यांना पूर्वीसारखी गोव्यात शांतता मिळत नाही, हे एक त्यातील महत्त्वाचे कारण.

केंद्र सरकारने २०४७पर्यंत १०० दशलक्ष पर्यटकांचे लक्ष्य बाळगले असेल तर पूर्तीसाठी दरवर्षी १५ टक्के वाढ हवी. तथापि, केंद्र या संदर्भात फारशी काळजी घेताना दिसत नाही. मागील दहा वर्षांत देशाची पर्यटनवृद्धी केवळ ८.५ टक्के राहिली आहे. पर्यटन क्षेत्रातील मक्तेदारी मानल्या गेलेल्या गोव्यापेक्षा बाली, श्रीलंका, व्हिएतनाम आदी देशांत किफायतशीर दरांत पर्यटनाचा अनुभव घेता येतो, या ‘इन्फ्लुएन्सर’नी चालवलेल्या प्रचारामुळे गोवा सरकारला जागतिक स्पर्धेचे आत्मभान येणे अपेक्षित आहे.

Goa Toolkit Controversy: आत्मपरीक्षणाचे ‘टुलकिट’ हवे
Goa Politics: खरी कुजबुज: चर्चिलची ‘बीफ मध्‍यस्‍थी’

रशिया (Russia) व युरोपातील अनेक देश स्वस्तात उपलब्ध आहेत. तेथे वाहतुकीच्या चांगल्या सुविधा, ऐतिहासिक स्थळांची होत असलेली देखभाल, निसर्ग व पर्यटन याची निगा अधिक चांगल्या पद्धतीने राखली आहे. याचा विचार केंद्र सरकारने साकल्याने करायला हवा. गोव्यात ‘दाबोळी’च्या साथीने मोपा विमानतळ कार्यरत झाला. परंतु विमान कंपन्यांवर केंद्राचे मुळीच निर्बंध नाहीत. दिल्ली ते बँकॉक बिझनेस क्लास आकार दिल्ली ते गोव्याच्या भाड्यापेक्षा कमी आहे. किफायतशीर अ‍ॅपआधरित टॅक्सी सेवा गोव्यात कार्यक्षमतेने सुरू करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Goa Toolkit Controversy: आत्मपरीक्षणाचे ‘टुलकिट’ हवे
Goa Politics: वर्ष संपलं तरी मंत्रिमंडळ बदलाला मुहूर्त नाही! प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

गोवा किफायतशीर आहे हे हॉटेल्स, विमानाचे भाडे आणि सुविधांमधून दिसणे अपेक्षित आहे. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागेल. समाजमाध्यमांवरून होणारी बदनामी गोव्यासाठी इष्टापत्ती ठरावी. मूळ समस्या ओळखून त्या मान्य केल्या तरच सोडविणे शक्य आहे. बाकी गोव्याकडे सर्व प्रकारचे सौंदर्य आहे. वर्षारंभ, वर्षाखेर, नाताळ यामुळेच गर्दी होते हा गोव्याचा रिवाज नाही. बारमाही दर्दी पर्यटकांचा प्रियकर म्हणजे गोवा. समुद्रातले पाणी आणि मद्यालयातली फेणी आटत नाही ते गोवा. फरक आहे तो केवळ ‘क्लास’ आणि ‘मास’मधला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com