Goa Politics: वर्ष संपलं तरी मंत्रिमंडळ बदलाला मुहूर्त नाही! प्रदेशाध्यक्ष पदासाठी अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

Goa Cabinet: मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा केवळ चर्चाच असल्याचे वारंवार निष्पन्न होत असले तरी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा झाली की अशा चर्चेला पुन्हा उर्जितावस्था मिळत राहिली.
Goa Politics
Goa BJP|Pramod Sawant|Sadanand Tanavade Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Cabinate Change Political Updates

पणजी: राज्याचे पावसाळी अधिवेशन पार पडल्यानंतर राज्यात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली ती वर्षाच्या शेवटच्या डिसेंबरच्या महिन्यातही केवळ चर्चाच राहिली. तर लोकसभेच्या एप्रिल ते जून मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलाचीही चर्चा अद्याप केवळ गुऱ्हाळाचे कारण बनली आहे. त्यामुळे आता दोन्ही प्रक्रिया २०२५ मध्ये मार्गी लागतील काय, याकडे आता भाजपच्याच कार्यकर्त्यांचे किंवा समर्थकांचे लक्ष लागले आहे.

राज्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखालील भाजपचे सरकार मजबूत आहे. परंतु पावसाळी अधिवेशनापूर्वी ज्या मंत्र्यांवर आरोप झाले, त्यामुळे अधिवेशनानंतर त्या मंत्र्यांची गच्छंती होणार अशी अटकळ बांधली जात होती. विशेष बाब म्हणजे मुख्यमंत्र्यांनीही त्याला दुजोरा दिल्याने मंत्रिपदाच्या शर्यतीत असणाऱ्या काही आमदारांच्या समर्थकांनी देव पाण्यात ठेवले होते.

Goa Politics
Goa Politics: ..'मंत्रिमंडळ फेरबदल' आताच होणार असे नाही! तानावडेंच्या प्रतिक्रीयेमुळे चर्चांना पूर्णविराम

मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा केवळ चर्चाच असल्याचे वारंवार निष्पन्न होत असले तरी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा झाली की अशा चर्चेला पुन्हा उर्जितावस्था मिळत राहिली. २०२४ चे वर्ष आता संपुष्टात येण्यास काही दिवसांचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे २०२५ वर्षतरी आपणास मंत्रिपद देऊन जाईल, असे आता इच्छुक उघडपणे समर्थकांत बोलू लागले आहेत.

Goa Politics
Goa Cabinet: विश्‍वजीत राणेंना संभाव्य मंत्रिमंडळ बदलात मिळणार 'महत्त्वाचे' स्थान; PM मोदींच्या भेटीमुळे राजकीय चर्चेला ऊत

अनेकांचे गुडघ्याला बाशिंग

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मंत्री-आमदार दिल्लीला जाऊन आल्याने पुन्हा फेरबदलाचीच चर्चा सुरू झाली, पण ती चर्चाही पेल्यातील वादळ असल्याचे दिसून आले. याशिवाय विधानसभेच्या आणि पंचायत, नगरपालिकांच्या निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकीतही भाजपने प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्या नेतृत्वाखाली यश मिळविले. लोकसभेच्या निवडणुकीनंतर प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली अन् इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली. काहींनी या पदासाठी गुडघ्याला बाशिंगही बांधले होते. परंतु हा बदल करण्याचे धारिष्ट्यही केंद्रीय नेतृत्वात झालेले नाही, त्यामुळे ही प्रक्रियाही आता २०२५ मध्ये लांबणीवर पडणार हे स्पष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com