Goa Politics: 'ही टीका नसून आश्वासनांची आठवण', मुख्यमंत्र्याच्या तंबीनंतर काब्रालांनी दिले स्पष्टीकरण

Nilesh Cabral clarifies government criticism: नीलेश काब्राल म्हणाले, इस्पितळाला काही सुविधा कमी आहेत असे मी म्हटले, पण मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री या प्रश्नावर काम करत आहेत.
Pramod Sawant, Nilesh Cabral
Pramod Sawant, Nilesh Cabral X
Published on
Updated on

Nilesh Cabral CM Pramod Sawant Allegations Clarification

पणजी: माजी मंत्री तथा आमदार नीलेश काब्राल यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाची पुनरावृत्ती करून सरकारवर टीका केली होती. मात्र, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पक्षाच्या आमदारांना सार्वजनिकरीत्या नकारात्मक विधाने न करण्याची तंबी दिल्यानंतर काब्राल यांनी आपण सरकारवर टीका केली नसून केवळ मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली, असे स्पष्टीकरण दिले.

दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पक्षाच्या आमदारांना सार्वजनिकरीत्या नकारात्मक विधाने न करण्याचे आवाहन करत कोणतेही प्रश्न किंवा समस्या पक्षाच्या अंतर्गत चर्चेत सोडवण्यास सांगितले.

नीलेश काब्राल म्हणाले, इस्पितळाला काही सुविधा कमी आहेत असे मी म्हटले, पण मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री या प्रश्नावर काम करत आहेत. नागरिक जेव्हा प्रश्न विचारतात, तेव्हा मी त्यांना हीच माहिती दिली.

Pramod Sawant, Nilesh Cabral
Goa Politics: खरी कुजबुज: बेपत्ता बासुदेव गेला कुठे?

माझी मुख्यमंत्र्यांवर टीका नाही; काब्राल

कुडचडे बसस्थानक प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचा उशीर आणि अन्य विकासकामांवर विचारणा झाल्यावर काब्राल यांनी सांगितले की, २०१३-१४ पासून सुरू असलेल्या प्रकल्पांवर अजूनही पाठपुरावा सुरू आहे. मी टीका केली नाही आणि मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ते आमचे मुख्यमंत्री असून सरकार आपलेच आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

Pramod Sawant, Nilesh Cabral
Goa Politics: खरी कुजबुज: म्हादई विषय, नको रे बाबा!

जिल्हाध्यक्ष निवडणुका शुक्रवारी

भाजप पक्षाच्या जिल्हाध्यक्ष निवडणुका १० जानेवारीला होणार असून, ११ जानेवारीला निवडणूक निकाल जाहीर केले जातील. त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com