
Actor Suniel Shetty Interview
मुंबई: हेरा फेरी, मै हूं ना, धडकन, मोहरा, बॉर्डर, बलवान यासरख्या सिनेमात उत्कृष्ट अभिनय केलेला सुनील शेट्टी भारतीय चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आहे. फिटनेस आणि सडेतोड भूमिकांसाठी नेहमीच चर्चेत असणाऱ्या सुनील शेट्टीने नुकताच मोठा खुलासा केला आहे. सुनील शेट्टीच्या वडिलांना अंडरवर्ल्डच्या गँगस्टरने गोळी मारण्याची धमकी दिली होती. याला सुनील शेट्टीने देखील जोरदार प्रतित्युत्तर दिले होते.
सुनील शेट्टीने अलिकडेच लल्लनटॉप या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीत सुनील शेट्टीने त्याचा अभिनयाचा प्रवास, स्ट्रगल आणि आयुष्यातील चढ उतारांवर भाष्य केले आहे. सुनील शेट्टीने त्याला अंडरवर्ल्डच्या गँगस्टरने दिलेल्या धमकीचा किस्सा सांगितला.
"गँगस्टर हेमंत पुजारी मला नेहमी फोन करायचा. त्याचे लोक माझ्या घरी, ऑफिस, माझ्या मॅनेजरला फोन करुन धमकी द्यायचे. शेट्टीला धमकी दिल्यानंतर खंडणी देतील, अशा उद्देशाने ते फोन करायचे", असे सुनील शेट्टी म्हणाला.
"एक दिवस मला हेमंत पुजारीने फोन केला आणि तुझे वडील सकाळी मॉर्निंग वॉकला जातात तेव्हा त्यांनी गोळी मारणार अशी धमकी दिली. मला हे सहन झाले नाही आणि मी सुद्धा त्याला शिव्या दिल्या. मी ओरडून त्याला सांगितले की तुला माझ्या बद्दल जेवढे माहिती नाही तेवढे मला माहितीये. माझ्याकडे तुझ्यापेक्षा जास्त पैसे आणि नेटवर्क आहे. त्यामुळे माझ्यापासून लांब राहा," अशी सुनील शेट्टीने त्याला समज दिल्याची माहिती त्याने दिली.
सुनील शेट्टी याने या मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, हा फोन कॉल त्यांनी रेकॉर्ड केला होता. यानंतर त्याने पोलिसांना संपर्क करुन घडलेल्या प्रकारची माहिती दिली. पोलिसांनी सुनील शेट्टीला त्यांना शिव्या न देण्याचा सल्ला दिला. तसेच, नशेत हे लोक असेच करतात, असेही पोलिसांनी त्यांना समजवल्याचे सुनीलने मुलाखतीत सांगितले. बॉलीवूड कलाकारांना अशा प्रकारच्या धमकीचे फोन येणे सामान्य असल्याचे सुनीलने या मुलाखतीत सांगितले.
सुनीलने यावेळी त्याला क्रिकेटमध्ये करिअर करायचे होते असेही सांगितले पण, कालांतराने हा विचार मागे पडत गेल्याचे तो म्हणाला. मुंबईत आल्यानंतर केलेल्या कष्टाची माहिती देखील यावेळी त्याने यावेळी दिली.
सुनील शेट्टीचा केसरी वीर सिनेमा २३ मे रोजी प्रदर्शित झाला आहे. सध्या तो हेरा फेरी ३, सन ऑफ सरदार २ आणि वेलकम टु जंगल या सिनेमांवर काम करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.