Pernem: चालकाचा ताबा सुटला, टॅक्सीने उडवले 3 खांब; पराष्टे-पेडणेतील अपघातात वीज खात्याचे मोठे नुकसान

Parashte Pernem Accident: हरमलहून पेडणेच्या दिशेने जात असलेली टॅक्सी पराष्टे गावाजवळ आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टॅक्सी थेट वीज खांबावर आदळली.
Tourist Taxi Hits Electric Poles in Parashte Pernem
Parashte Pernem AccidentDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: पेडणे तालुक्यातील पराष्टे येथे शुक्रवारी (२४ मे) रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक पर्यटक टॅक्सी अनियंत्रित होऊन विजेच्या खांबाला धडकली. या अपघातात सलग तीन वीज खांब मोडून पडले असून, टॅक्सीचेही मोठे नुकसान झाले आहे.

सविस्तर माहितीनुसार, हरमलहून पेडणेच्या दिशेने जात असलेली टॅक्सी पराष्टे गावाजवळ आली असता, चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि टॅक्सी थेट वीज खांबावर आदळली.

या धडकेमुळे पहिला खांब तुटून खाली पडला आणि त्याच विजेच्या तारांमुळे ओढले गेलेले अन्य दोन खांबही कोसळले. यामुळे पराष्टे भागाचा वीजपुरवठा तात्पुरता बंद करण्यात आला.

Tourist Taxi Hits Electric Poles in Parashte Pernem
Kudal Accident: कुडाळ-मालवण मार्गावर बस आणि डंपरची समोरासमोर धडक; बसचालकासह प्रवासी जखमी

या अपघातामुळे वीज खात्याला अंदाजे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पेडणे वीज विभागाने याबाबतची अधिकृत तक्रार पेडणे पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.

दरम्यान, पोलिसांकडून अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com