Amitabh Bachchan: वेडा नाटकवाला, शास्त्रीय गायक! 'अमिताभ बच्चन' यांचे हे सिनेमे तुम्ही बघितले नसणार..

Amitabh Bachchan unknown movies: अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबर रोजी वयाची ८३ वर्षे पूर्ण करत आहेत. बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीत हिंदी, भोजपुरी, तामिळ अशा भाषांमधून एकूण ३०० पेक्षा जास्त सिनेमांमधून काम केले आहे.
Amitabh Bachchan underrated movies
Amitabh Bachchan underrated moviesDainik Gomantak
Published on
Updated on

महत्वाचे मुद्दे

१. अमिताभ बच्चन २०२५ साली वयाची ८३ वर्षे पूर्ण करतील.

२. अमिताभ बच्चन यांनी ३०० हुन जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे.

३.अमिताभ बच्चन यांच्या फारश्या माहित नसलेल्या ५ सिनेमांची माहिती इथे दिली आहे.

बिग बी अमिताभ बच्चन ११ ऑक्टोबर रोजी वयाची ८३ वर्षे पूर्ण करत आहेत. अमिताभ बच्चन यांनी आपल्या कारकिर्दीत हिंदी, भोजपुरी, तामिळ अशा भाषांमधून एकूण ३०० पेक्षा जास्त सिनेमांमधून काम केले आहे. वयाची ८३ वर्षे पूर्ण केली तरी ते अजूनही कार्यरत आहेत.

अलीकडेच त्यांनी कल्की, वैट्टियन या सिनेमांमधून काम केले आहे. कौन बनेगा करोडपतीच्या नव्या भागाच्या चित्रकरणात ते आजही व्यस्त आहेत. पुढच्या काळात त्यांचे कल्की- भाग दोन, १२० बहादूर, सेक्शन ८४, कॉकटेल २ या सिनेमातूनही दिसणार आहेत.

बच्चन यांचे प्रसिद्ध सिनेमे रसिकांना माहिती आहेत. पण त्यांचे काही महत्वाचे सिनेमे लोकांपर्यंत हवे तसे पोहोचू शकले नाहीत. आज पण त्या सिनेमांची माहिती घेऊ.

लास्ट लिअर (२००७)

प्रसिद्ध दिगदर्शक रितुपर्णा घोष यांनी दिग्दर्शित केलेला द लास्ट लिअर हा सिनेमा बच्चन यांच्यासाठी जरूर पाहा. या सिनेमात बच्चन यांच्यासोबत अर्जुन रामपाल, प्रीती झिंटा, शेफाली शहा आणि दिव्या दत्ता आहेत. यात अमिताभ यांनी एका नाट्यकलाकाराची भूमिका साकारली आहे.

आलाप (१९७७)

हृषीकेश मुखर्जी दिग्दर्शित आलाप हा सिनेमा १९७७ साली प्रदर्शित झाला होता. या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा, फरीदा जलाल, ओमप्रकाश, संजीव कुमार अशी कलाकारांची फौज आहे. खास गोष्ट म्हणजे या सिनेमात बच्चन यांना येसूदास यांचा आवाज आहे.

मै आझाद हूँ (१९८९)

हा चित्रपट टिनू आनंद यांनी दिग्दर्शित केला होता. या सिनेमात बच्चन यांच्यासोबत शबाना आझमी, अनुपम खेर, अन्नू कपूर हेही कलाकार आहेत. हा सिनेमा फ्रॅंक काप्राच्या फिल्मवर आधारित होता.

बेनाम (१९७४)

नरेंद्र बेदी दिग्दर्शित हा सिनेमा एक थ्रिलर स्टोरी होती. या सिनेमात मौसमी चट्टेर्जी, कादर खानसोबत मदन पुरी एका वेगळ्याच भूमिकेत आहे. हा सिनेमा हिचकॉकच्या मॅन हू न्यू टू मचवर आधारित आहे.

Amitabh Bachchan underrated movies
Amitabh Bachchan: 'नवरा संकटात असताना मी तो पर्याय निवडला' बीग बी यांच्या कठीण काळाविषयी जया बच्चन यांचे वक्तव्य

बंधे हाथ ( १९७३)

ओ. पी. रल्हन दिग्दर्शित हा सायको-थ्रिलर चित्रपट जंजीरपूर्वी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी चोर आणि कवी अशी दुहेरी भूमिका साकारली होती. या चित्रपटात बिग बी प्रथमच मुमताजसमोर पडद्यावर आले होते.

Amitabh Bachchan underrated movies
Amitabh Bachchan AI Photo : बॉलिवूडचा शहनशहाला चित्रपटसृष्टीत 55 वर्ष पूर्ण, बिग बींचा AI फोटो पाहिला का?

FAQs

Q1. २०२५ साली अमिताभ बच्चन वयाची किती वर्षे पूर्ण करतील?

A1.२०२५ साली अमिताभ बच्चन वयाची ८३ वर्षे पूर्ण करतील.

Q2.अमिताभ बच्चन यांनी किती सिनेमात काम केले आहे?

A2.अमिताभ बच्चन यांनी ३०० पेक्षा जास्त सिनेमे केले आहेत.

Q3. अमिताभ बच्चन यांचे पुढच्या काळात सिनेमे रिलीज होणार आहेत का?

A3. हो. अमिताभ यांचे कल्की- भाग दोन, १२० बहादूर, सेक्शन ८४, कॉकटेल २ हे सिनेमे येणार आहेत.

Q4. अमिताभ बच्चन यांचा किती साली जन्म झाला?

A4. अमिताभ बच्चन यांचा १९४२ साली जन्म झाला

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com