Amitabh Bachchan: 'नवरा संकटात असताना मी तो पर्याय निवडला' बीग बी यांच्या कठीण काळाविषयी जया बच्चन यांचे वक्तव्य

Amitabh Bachchan: त्यामुळे जया बच्चन सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
Amitabh Bachchan
Amitabh Bachchan Dainik Gomantak

Jaya Bachchan talking about amitabh bachchan bad phase

बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटामुळे, कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तर कधी मुलाखतीत केलेल्या वक्तव्यांमुळे मोठ्या चर्चेत असतात. आता जया बच्चन यांनी बॉलीवूडचे बीग बी अमिताभ बच्चन यांच्या कठीण काळाविषयी नात नव्या नंदाच्या पॉडकास्टमध्ये वक्तव्य केले आहे, त्यामुळे जया बच्चन सध्या चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

श्वेता नंदा यांची मुलगी नव्या नंदा 'व्हॉट द हेल नव्या' ( What The Hell Navya ) या यु-ट्युबवरील पॉडकास्टच्या माध्यमातून चाहत्यांसमोर वेगवेगळ्या बाबींवर चर्चा करत असल्याचे पाहायला मिळते. या दुसऱ्या सीझनमध्ये नव्या आपली आजी जया बच्चन आणि श्वेता बच्चन यांच्याशी प्रेम, लग्न, समाज, रिलेशनशिप, स्त्री-पुरुष यांचे एकमेकांच्या आयुष्यातील स्थान, महत्व अशा वेगवेगळ्या गोष्टींवर ती चर्चा करताना दिसते. आता नव्या एपिसोडमध्ये जया बच्चन यांनी अमिताभ बच्चन जेव्हा वाईट काळाचा सामना करत होते, तेव्हा त्यांनी कशाप्रकारे आपली भूमिका निभावली होती, याबद्दल भाष्य केले आहे.

जया बच्चन म्हणतात- 'आम्ही आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अपयशांना सामोरे गेलो. आम्ही त्यांचा एकत्रित सामना केला. मी बरोबर किंवा चुकीचं केलं हे मला माहित नाही, परंतु जेव्हा एखादा माणूस वाईट परिस्थितीतून जात असेल तेव्हा शांत रहा. तुम्ही हस्तक्षेप करत असाल, रागवत असाल तर समोरच्या व्यक्तीला खूप वाईट वाटतं. जर त्यांना तुमची मदत हवी असेल तर ते त्यासाठी विचारतील. पण सतत हस्तक्षेप करणे हे समोरच्याला चीड आणून देते. अशावेळी, आपण शांत राहून त्यांना असा विश्वास देऊ शकतो की, मी तुझ्या सोबत आहे.'

मात्र श्वेता नंदा यांनी जया बच्चन यांच्या मताशी असहमत असल्याचे सांगत म्हटले की- 'फक्त शांत राहणे मला योग्य वाटत नाही, जर समोरच्या व्यक्तीच्या प्रश्नाचे उत्तर माझ्याकडे असेल तर किंवा त्यावर उपाय असेल तर मी त्याला नक्की सांगेन. मला वाटतं पुरुषांना खूप अडचणी येतात. जर तुमचा एखादा मित्र काही अडचणीत असेल पण तुमची मदत( Help ) मागत नसेल तर तुम्ही त्याला मदत करणार नाही का? मी ते करेन.

जर तुम्ही तुमच्या मैत्रिणीसाठी हे करत असाल तर तुम्ही मित्रासाठी हे का करू शकत नाही? कधी-कधी मला वाटतं की माणसाला एवढच सांगण्याची गरज असते, ' कदाचित तुम्ही असा वेगळ्या अँगलने विचार करावा. कदाचित तुम्ही त्यांना कल्पना द्याल किंवा तुम्ही त्यांना एखादा मुद्दा द्याल ज्यावर ते काम करू शकतील. मी स्वत:हून मदत करू इच्छिते कारण मी एक प्रॉब्लेम सॉल्हव्हर आहे.

दरम्यान, अमिताभ बच्चन एकेकाळी बोफोर्स घोटाळ्यात अडकले होते, इतकेच नाही तर अमिताभ बच्चन यांनी अनेक वर्षे फ्लॉप चित्रपट दिले. ते एबी कॉर्पचे निर्मातेही बनले, पण त्यातही ते अयशस्वी ठरले. यशस्वी म्हटल्या जाणाऱ्या या अभिनेत्यावर अशी एक वेळ अशी आली की अमिताभ( Amitabh bachchan ) जवळजवळ दिवाळखोर झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com