Amitabh Bachchan AI Photo : बॉलिवूडचा शहनशहाला चित्रपटसृष्टीत 55 वर्ष पूर्ण, बिग बींचा AI फोटो पाहिला का?

Amitabh Bachchan AI Photo: अमिताभ बच्चन यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंट AI ने बनवलेला खास फोटो शेअर केला आहे.
Amitabh Bachchan AI Photo
Amitabh Bachchan AI Photo Dainik Gomantak

Amitabh bachchan share ai photo on Instagram 55 years career in cinema watch photo

बॉलीवूडचे शहनशाह अमिताभ बच्चन वयाच्या या टप्प्यावरही सिनेविश्वात सक्रिय आहेत. आज सुद्धा त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. अमिताभ यांना इंडस्ट्रीत जवळपास 55 वर्षे पुर्ण झाली आहेत. या गौरवशाली प्रवासात त्यांनी अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आणि विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. यानिमित्त्याने AI ने कास फोटो बनवला आहे. जो बिग बींनी सोशल मिडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

  • शेअर केलेला फोटो


अमिताभ यांनी त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. जे AI ने तयार केला आहे. एआय तंत्रज्ञानाने बनवलेल्या या फोटोत बिग बींच्या डोक्यात कॅमेरे आणि फिल्म प्रोडक्शन मशीन भरलेली आहे. यासोबतच अमिताभ बच्चन यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'चित्रपटाच्या या अद्भुत दुनियेत 55 वर्षे... आणि एआयने मला तपशील दिला आहे. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेताने लिहिले आहे, 'लव्ह इट'. तर अभिनेत्री इला अरुणने लिहिले आहे, 'वाह सर! विलक्षण दिसत आहे'. स्टार्ससोबतच अमिताभ बच्चन यांच्या चाहत्यांनीही कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. एका यूजरने लिहिले, 'अप्रतिम, तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी पूर्णपणे जुळते'. दुसऱ्या युजरने लिहिले, 'पण AI ला अंदाज का आला की तुम्ही स्क्रीनऐवजी कॅमेऱ्याच्या मागे आहात? भविष्यात कॅमेऱ्याच्या मागे राहून दिग्दर्शन करताना दिसण्याची शक्यता आहे का?

आगामी चित्रपट

या पोस्टवर सिनेसृष्टीत 55 वर्षे पूर्ण केल्याबद्दल स्टार्स आणि चाहतेही त्यांचे अभिनंदन करत आहेत. बिग बींच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर 'कल्की एडी 2898' हा त्यांचा आगामी चित्रपट आहे. या चित्रपटात ते सुपरस्टार कमल हासन आणि प्रभाससोबत रूपेरी पडद्यावर दिसणार आहेत. याशिवाय दीपिका पदुकोण आणि दिशा पटानी देखील या चित्रपटाचा एक भाग आहे. या पौराणिक चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com