भाजप समर्थकांकडून मये मतदारसंघात विजयोत्सव

कार्यकर्त्यांचे कष्ट: जमिनींचा प्रश्न, चोडण पूल उभारण्याची प्रमेंद्र शेट यांची ग्वाही
प्रेमेंद्र शेट
प्रेमेंद्र शेटDainik Gomantak

मये: मये मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार प्रेमेंद्र शेट यांच्या समर्थकांनी मये मतदारसंघात विजयोत्सव साजरा केला. मये मतदारसंघात भाजपने अपेक्षेप्रमाणे मोठे यश मिळवत प्रेमेंद्र शेट यांना विजयी केले. गोवा फॉरवर्ड व मगो उमेदवार पाच हजारखाली राहिले तसेच आरजी उमेदवाराने खूप चांगली मजल मारली आणि हीच त्यांची जमेची बाजू म्हणावी लागेल.

भाजपची संघटन शक्ती मयेत कामाला आली. आम्हला विजय पूर्ण अपेक्षित होता, अशी प्रतिक्रिया विजयी उमेदवार प्रेमेंद्र शेट तसेच मयेचे भाजपा गटाध्यक्ष दयानंद कारबोट कर यांनी दिली.

प्रेमेंद्र शेट
गोवा विधिमंडळ गटनेतेपदी डॉ.प्रमोद सावंत

मये मतदारसंघातून आपले बंधू स्व. अनंत शेट यांनी दिलेले योगदान डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकासयोजना व प्रत्येक घरात समृद्धीचा नारा याबरोबरच मतदारसंघातील कार्यकर्ते व मंडळ आदींनी केलेले काम यांच्या बळावर अपेक्षेप्रमाणे मयेतून भाजपला मोठी आघाडी मिळाली असून, या संधीचे सोने करीत आदर्श मतदारसंघाचे योगदान देण्यासाठी प्रामाणिक सेवा देणार असल्याची ग्वाही प्रेमेंद्र शेट यांनी दिली.

सातही पंचायत विभागातून शेट यांना बहुतेक बुथवर आघाडी मिळाली असल्याचे सांगण्यात आले. मुख्यमंत्री सावंत, प्रभारी सुलक्षणा सावंत तसेच महाराष्ट्रामधून आलेली नेते मंडळी समिती सर्व कार्यकर्ते मतदार आदींचे संघटित प्रयत्न कामी आले, असेही शेट यांनी सांगितले.

प्रेमेंद्र शेट
फोंडा तालुक्‍यात भाजपचे वर्चस्‍व

मये मतदारसंघातील सरकारी जमिनींचा प्रश्न, अलवरा कस्टोडियन प्रश्न तसेच चोडण पुलाची मागणी आदी अनेक योजना पाच वर्षात मार्गी लावणार असल्याचे त्यांनी सांगितले.

डिचोली तालुक्याला मुख्यमंत्रीपद व एक मंत्रिपद निश्चित मिळणार असून, विकासाला चालना देण्यासाठी तिन्ही आमदारांनी एकत्रित नियोजन करून काम केले तर निश्चितपणे डिचोली व मयेतील अनेक प्रकल्प पूर्ण करणे सहज शक्य आहे, अशा प्रतिक्रिया कार्यकर्त्यांतून व्यक्त होत आहेत

प्रेमेंद्र शेट
गोव्यात भाजपची हॅट्‌ट्रिक: काँग्रेसचे सत्तासंधान सलग तिसऱ्यांदा हुकले

हा विजय कार्यकर्त्यांचा

मी विजयी होण्याचे मुख्य कारण म्हणजे माझे सर्व कार्यकर्ते यांनी केलेले परिश्रम हेच आहे. आता मी मये मतदारसंघाचा आमदार असल्याने जनतेची सेवा करण्यासाठी प्रामाणिक कार्य करणार असून, मयेतील सर्व प्रश्न सोडवणे हा आपला ध्यास असल्याची प्रतिक्रिया प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केली.

विजय अपेक्षितच

मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर म्हणाले, हा विजय अपेक्षितच होता. भाजप संघटन मजबूत असून विकास व योजना घरोघरी पोचल्यानेच जनतेचा मोठा पाठींबा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रभारी सुलक्षणा सावंत यांनी भाजपच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. भाजप पुन्हा सत्तास्थानी येत आहे याचाही आनंद असल्याचे कारबोटकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com