गोव्यात भाजपची हॅट्‌ट्रिक: काँग्रेसचे सत्तासंधान सलग तिसऱ्यांदा हुकले

निम्मे आमदार गारद
BJP
BJPDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अंदाज, आडाखे, भाकिते आणि समीकरणे खोटी ठरवत भारतीय जनता पक्षाने 8 व्या विधानसभेत पन्नास टक्के जागा संपादन केल्या आहेत. तीन अपक्ष आमदारांसह 2 सदस्यीय महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचाही पाठिंबा मिळाल्याचे भाजप नेत्यांनी सांगितले असून काँग्रेसचे सत्तासंधान सलग तिसऱ्या निवडणुकीत हुकले आहे.

मांद्रे, डिचोली, शिवोली, हळदोणे, केपे, मुरगाव हे भरवशाचे मतदारसंघ भाजपने आज गमावले. मात्र, शेवटच्या क्षणी त्या पक्षाला नशिबाची साथ मिळाली. फोंडा मतदारसंघातून रवी नाईक हे मगोपचे केतन भाटीकर यांच्यावर अवघ्या 77 मतांची आघाडी घेत विजयी झाले आणि भाजपची आमदारसंख्या 20 वर पोहोचली. भाटीकर यांच्या पराभवामुळे मगोपचे बळ 2 आमदारांवर घसरले असून भाजपाकडे वाटाघाटी करण्याच्या मगोपच्या क्षमतेला धक्का पोहचला आहे.

BJP
'काँग्रेसने पराभव स्वीकारला, जबाबदार विरोधीपक्षाची भूमिका निभावणार'

मगोप (2) आदमी पक्ष (2) आरजी आणि (1) अपक्ष (3) असे भाजपा विरोधी बलाबल असले तरी 12 जागा मिळवणाऱ्या काँग्रेसला या सगळ्यांचे समाधान करून सरकार स्थापनेचा दावा करणे महादित्य ठरेल. त्यातच डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा पाठिंबा मिळवत भाजपने विरोधकांवर आधीच कुरघोडी केली. सायंकाळी कुडतरीचे रेजिनॉल्ड लॉरेन्स आणि कुठ्ठाळिचे आंतोनियो फर्नांडिस यांनीही भाजपा सरकारला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले.

20 आमदारांपर्यंत अनपेक्षित झेप घेणाऱ्या भाजपला मात्र अनेक मोहरे गमवावे लाागले आहेत. दयानंद सोपटे, दयानंद मांद्रेकर, ग्लेन टिकलो, राजेश पाटणेकर, मिलिंद नाईक, चंद्रकांत कवळेकर, क्लाफासियो डायस, आंतोनिया फर्नांडिस, फ्रान्सिस सिल्वेरा, जयेश साळगावकर, मनोहर आजगावकर, विनोद पालयेकर, चर्चिल आलेमाव, दिपक पाऊसकर या आमदारांना पराभवाला सामारे जावे लागेल.मगोप पक्षाध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्यासह डिचोलीत नरेश सावळपान

सभापतींच्या पराभवाची परंपरा

या निवडणुकीत गोव्यातील परंपरा कायम राहिली. प्रत्येक निवडणुकीमध्ये सभापतींचा पराभव हा निश्चित असतो. या निवडणुकीत देखील सभापतींचा पराभव झाला. आमदार व सभापती राजेश पाटणेकर यांचा पराभव डॉ.चंद्रकांत शेट्ये (अपक्ष) यांनी पराभव केला. पाटणेकर हे सभापती होण्याअगोदर प्रमोद सावंत हे सभापती होते. नंतर ते मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्रिपद स्वीकारुन अडीच वर्षे झाली तरी देखील मुख्यमंत्र्यांना विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला, हा सभापतीपदाचा इफेक्ट असल्याची चर्चा आहे. प्रतापसिंग राणे वगळता आतापर्यंत जवळपास सर्वच सभापतींचा पराभव झालेला आहे.

मगोप-तृणमूलचाही अपेक्षाभंग

भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेलेले मायकल लोबो कळंगुटमधून विजयी झाले. तर कार्लुस आल्मेदा (वास्को-काँग्रेस) इजिदोर फर्नांडिस (काणकोण-अपक्ष) फिलीप नेरी रॉड्रिग्स (राष्ट्रवादी-वेेळ्ळी) विल्फ्रेड डिसा (नुवे-अपक्ष) एलिना साल्ढाणा (कुठ्ठाळी-आप) प्रविण झाट्ये (मये-मगोप) या भाजपमधून पक्षांतर करणाऱ्या मावळत्या विधानसभेच्या आमदारांनाही पराभवाचा झटका बसला. 6 ते 8 जागा मिळवून किंगमेकर बनू पाहणाऱ्या मगो-तृणमूलचाही अपेक्षाभंग झाला.

जनतेच्या जनादेशाचा आम्ही सन्मानपूर्वक स्वीकार करतो. गोव्यात पराभव स्वीकारला असून पुढेही जनतेसाठी काम करत राहू. मात्र, गोव्यातील जनतेला बदल हवा आहे. भाजपला केवळ 33 टक्के मते मिळालीत. अनेक मतदार विभागले गेल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसला आहे. भाजपविरोधी मतं विभागली गेल्याने भाजपचा सत्तेचा मार्ग सुकर झाला.

- पी. चिदंबरम, ज्येष्ठ काँग्रेस नेते

BJP
लोबो दाम्पत्य जिंकूनही सत्तेपासून राहणार दूरच

दिवंगत नेते मनोहर पर्रीकर यांचे पूत्र उत्पल यांच्याविरोधातील लढतीमध्ये रिस्कचा प्रश्न नव्हता, तर तो आमच्यासाठी भावनिक विषय होता. आमचे पर्रीकर घराण्याशी भावनिक ऋणानुबंध आहेत.

मला बाबुश मोन्सेरात यांच्या विजयामुळे नक्कीच आनंद झाला आहे. पण उत्पल पर्रीकर निवडणुकीत पडले, यासाठी मी आनंदी नाही.

- देवेंद्र फडणवीस, भाजप नेते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com