गोवा विधिमंडळ गटनेतेपदी डॉ.प्रमोद सावंत

रणनीती: बहुमत मिळाल्याने धावपळ करण्याची गरज नाही : फडणवीस
Dr. Pramod Sawant
Dr. Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी:  विधानसभा निवडणुकीत भाजपला 20 जागा मिळाल्या असून मगोप आणि तीन अपक्ष आमदारांनी पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ 25 झाले आहे. त्यामुळे भाजपचा सत्तेचा मार्ग मोकळा झाला आहे. आज गुरुवारी रात्री दिल्लीत उशिरा केंद्रीय संसदीय समितीची बैठक होऊन गोव्यासाठी विशेष निरीक्षकाची निवड केली जाईल. ते शुक्रवारी गोव्यात येत असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या विधिमंडळ सदस्यांची बैठक होईल. त्यात गटनेते पदाची निवड केली जाईल.

त्यानंतर ते राज्यपालांकडे सत्ता स्थापनेसाठीचा दावा करतील अशी माहिती गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोव्यातल्या निवडणूक डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढविली असल्याने तेच विधिमंडळ पक्षाचे नेते असतील त्यांच्या निवडीचा सोपस्कर उद्या पूर्ण केला जाईल.

Dr. Pramod Sawant
Goa Election 2022 : मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांची हँट्रीक

भाजपच्या विजयानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये फडणवीस यांनी सत्तास्थापनेची माहिती दिली.. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, सी.टी रवी, केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, 10 वर्षांनंतर गोव्यातील जनतेने भाजपला पुन्हा स्पष्ट बहुमत दिले आहे. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्य सरकारच्या डबल इंजिन सरकारचे यश आहे. आम्हाला बहुमत मिळाले तरीही आम्ही मगोप आणि इतरांची मदतीने सरकार बनवणार आहोत.

Dr. Pramod Sawant
Goa Election 2022 Live Update: सर्वाधिक जागा जिंकून भाजपचे 'सत्तारोहण'

आम्हाला बहुमत मिळाल्यामुळे धावपळ करण्याची गरज नाही. काँग्रेसने कालच राज्यपालांकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. मात्र, काँग्रेसचे कुणीही आज राज्यपालांच्या भेटीला जाऊ शकले नाही टोला त्यांनी लगावला.

सलग दहा वर्षे सत्तेत असल्याने अँटीइन्कबन्सीमुळे भाजप परत निवडून येणार नाही असे काही लोक म्हणत होते. मात्र, मागच्या वेळेपेक्षा जास्त मते मिळवून भाजप सत्तेवर येत आहे. 2022 मध्ये 22 प्लस जागा जिंकण्याचा आमचा निर्धार होता. पण तीन जागा अत्यंत कमी फरकाने हरलोत. तरीही आम्ही बहुमतापर्यंत पोहोचलो हे महत्त्वाचे आहे.डॉ.प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com