सासष्टीच्या चार जागांवरील अनिश्चितता; काँग्रेसमध्ये चिंता

कमी जागा मिळाल्यास सत्तेची दारे बंद होण्याची शक्यता
Congress
CongressDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: मडगाव, नुवे व कुंकळ्ळी या तीन मतदारसंघात काँग्रेस आणि फातोर्ड्यात गोवा फॉरवर्ड या सासष्टीतील चार जागा काँग्रेस - गोवा फॉरवर्ड युतीसाठी पोषक असल्या तरी बाणावली, नावेली, कुडतरी व वेळ्ळी या चार मतदारसंघात त्यांचे स्थान दोलायमान असल्याने काँग्रेसची स्थिती चिंताजनक बनली आहे. सासष्टी हातची गमावल्यास कदाचित काँग्रेसला सत्तेची दारेही बंद होऊ शकतात.

एरव्ही बाणावली हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला. मात्र, २००२ नंतर या मतदारसंघात एकदाही काँग्रेस निवडून आलेली नाही. अशा परिस्थितीत यावेळीही हा मतदारसंघ आप किंवा तृणमूलकडे जाण्याची शक्यता असल्याने यावेळीही बाणावलीत काँग्रेसची पाटी कोरीच राहण्याची शक्यता आहे. तिथे खरी लढत तृणमूलचे चर्चिल आलेमाव व आपचे व्हेंझी व्हिएगस यांच्यात होणार आहे.

Congress
दिल्लीतील नेत्यांना भेटून विश्‍वजीत राणे परतले

कुडतरी हाही तसा काँग्रेस धार्जिणा मतदारसंघ. पण, काँग्रेसचे मोरेन रिबेलो हे सध्या अपक्ष उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांच्या तुलनेत काहीसे पिछाडीवरच आहेत.

वेळ्ळी मतदारसंघात सुरवातीला काँग्रेसचे सावियो डिसिल्वा यांचे पारडे जड वाटायचे मात्र. आता, तिथे खरी लढत राष्ट्रवादीचे फिलीप नेरी रॉड्रिग्स व तृणमूलचे बेंजामिन सिल्वा यांच्यात असल्याचे सांगितले जाते.

नावेली मतदारसंघात एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी पाच उमेदवारामध्ये बिगर भाजपची मते विभागून जाणार आहेत. या मतदारसंघात भाजपची स्वतःची अशी मते असून ही सर्व मते भाजपने राखून ठेवली तर त्यांचे उमेदवार असलेले उल्हास तुयेकर हे निवडूनही येऊ शकतात. वास्तविक या मतदारसंघात खरी लढत तृणमूलच्या वालांका आलेमाव आणि आपच्या प्रतिमा कुतिन्हो यांच्यात असून काँग्रेसचे आवेर्तन फुर्तादो हे येथे तिसऱ्या क्रमांकावर फेकले जाऊ शकतात

Congress
अपक्षांना येणार ‘सोन्याचे दिवस’

सासष्टी राखून ठेवण्याचा कॉंग्रेसचा निर्धार

असे जरी असले तरी आम्ही सासष्टी राखून ठेऊ, असा विश्वास काँग्रेसचे विधिमंडळ नेते व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी व्यक्त केले. तर काँग्रेस सासष्टीत कमी पडली तरी त्याची कसर हा पक्ष यावेळी बार्देस तालुक्यात भरून काढू शकेल अशी अपेक्षा त्यांचे युतीतील भागीदार असलेले गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी व्यक्त केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com