प्रतापसिंग राणे, सिद्धेशची माघार भाजपच्या पथ्यावर

बंड शमले : श्रीपाद नाईक यांची महत्त्वपूर्ण भूमिका : नेत्यांची शिष्टाई यशस्वी
Pratap singh Rane and Siddhesh Naik Goa Election
Pratap singh Rane and Siddhesh Naik Goa ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांनी अखेर राजकीय निवृत्ती जाहीर केल्यामुळे पर्ये मतदारसंघाविषयी चाललेला राजकीय संघर्ष आज संपुष्टात आला. त्यामुळे गेले काही दिवस अस्वस्थ असलेले विश्‍वजीत राणे यांनी सुस्कारा सोडला असतानाच सिद्धेश नाईक यांनीही कुंभारजुवेतून निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय मागे घेतला. या दोन्ही जागांचे प्रश्‍न सामोपचाराने मिटल्याने भाजपसमोरील दोन मोठे पेच संपुष्टात आले. राणे आणि सिद्धेश यांनी घेतलेली भूमिका भाजपच्या पथ्यावर पडली आहे. (Pratap singh Rane and Siddhesh Naik Goa Election News Updates)

Pratap singh Rane and Siddhesh Naik Goa Election
फिलिप नेरींचा भाजपला रामराम! NCPकडून वेळ्ळी मतदारसंघाची उमेदवारी जाहीर

प्रतापसिंग राणे यांनी पर्ये मतदारसंघाविषयी घेतलेल्या भूमिकेमुळे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे चांगलेच अडचणीत आले होते. हा गृहकलहाचा विषय असला तरी त्यामुळे विश्‍वजीत राणे (Vishwajit Rane) यांच्या राजकीय अस्तित्वालाच धोका निर्माण झाला होता. मात्र, राणे यांनी अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतल्यामुळे या विषयावर पडदा पडला. दुसरीकडे कुंभारजुवे मतदारसंघात जेनिता मडकईकर यांना भाजपची उमेदवारी मिळाल्यामुळे सिद्धेश नाईक यांनी भाजपचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची भूमिका घेतली होती. यामुळे त्यांचे वडील तथा केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. मात्र, त्यांना समजावण्यात श्रीपाद नाईक यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. या विषयात दिल्लीतील भाजप (BJP) नेत्यांनीही महत्त्वाची शिष्टाई केली. भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हा विषय संपुष्टात येईपर्यंत ते सतत दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात होते.

Pratap singh Rane and Siddhesh Naik Goa Election
फातोर्ड्यात दामू आणि विजय पुन्हा आमनेसामने

माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे (Pratap Singh Rane) यांचे नाव काँग्रेसने डिसेंबरमध्ये पर्येमधून उमेदवार म्हणून निवडले होते. भाजपने गेल्या आठवड्यात त्यांची सून डॉ. दिव्या विश्वजीत राणे या पर्येमधून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. पर्ये हा राणेंचा बालेकिल्ला आहे. ते या मतदारसंघातून एकदाही पराभूत झालेले नाहीत.

दुसरीकडे नाट्यमय घडामोडीत भाजपचे जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांनी आपण कुंभारजुवे मतदारसंघामधून निवडणूक लढवणारच, असा बंडाचा पवित्रा घेत कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. मात्र, गोवा प्रभारी आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टाईनंतर सिद्धेश नाईक यांनी निवडणुकीतून माघार घेतली. सध्या तरी या दोन महत्त्वाच्या जागांसाठी भाजपमधील अंतर्गत मतविभाजन टाळले जाणार असून त्याचा भाजपला फायदा होईल, असे सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com