फिलिप नेरींचा भाजपला रामराम! NCPकडून वेळ्ळी मतदारसंघाची उमेदवारी जाहीर

जुलै 2019मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेल्या 10 आमदारांपैकी एक फिलिप नेरी होते.
Philip Neri Rodriguez join NCP
Philip Neri Rodriguez join NCPDainik Gomantak
Published on
Updated on

गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी (Goa Assembly Election 2022) अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला. गोव्यात पक्षांतराचा सर्वात जास्त फटका कॉंग्रेस पक्षाला बसला. आत गोव्यातील सत्ताधारी भाजपला (BJP) देखील मोठे झटके बसताना दिसत आहे. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) गोव्यात भाजपला मोठे खिंडार पाडले आहे. आज सकाळी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेल्या नेत्याने आजच दुपारी राष्ट्रवादीचे घड्याळ हाताला बांधले. राष्ट्रवादीनेही त्यांना गोव्यातील वेळ्ळी मतदारसंघातून विधानसभेची उमेदवारही दिली. त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद गोव्यात वाढली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आणखी एक यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीच्या या यादीत 12 जणांना पक्षाने तिकीट दिलं आहे. यात भाजप सोडून आजच राष्ट्रवादीत दाखल झालेल्या फिलिप नेरींना वेळ्ळीतून उमेदवारी देण्यात आली आहे.

गोव्याचे जलस्त्रोत मंत्री आणि आमदार फिलिप नेरी रॉड्रिग्ज (Philip Neri Rodriguez) यांनी आपला मंत्रिपदासह आमदारकीचाही राजीनामा आजच सकाळी दिला होता़. वेळ्ळीत काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेल्या नेरी यांनी मंत्रिपद मिळवलं होतं. मात्र गेल्या काही दिवसांपासून नेरींच्या पक्ष सोडण्याच्या चर्चा राज्यात रंगल्या होत्या. आणि आज नेरी यांनी भाजपचा राजीनामा दिल्याने त्यावर शिक्कामोर्तबच झाले आहे.

Philip Neri Rodriguez join NCP
बाणावलीतून चर्चिल तर नावेलीतून वालांकाची उमेदवारी दाखल

आपण वेळ्ळी मतदारसंघातुन निवडणूक लढवावी का? निवडणूक (Election) लढायची झाल्यास अपक्ष म्हणून लढावे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर लढावे यावर फिलिप यांनी कार्यकर्त्यांचे मत मागील आठवड्यात जाणून घेतले. दरम्याल कार्यकर्त्यांनी फिलिप यांना राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडणूक लढण्याचा आग्रह केला. कार्यकर्त्यांच्या निर्णयाला मान देऊन फिलिप यांनी सोमवारी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याचे ठरवले आणि आज त्यांनी कमळची साथ सोडून हाताला घड्याळ बांधले.

Philip Neri Rodriguez join NCP
TMC चे उपाध्यक्ष लुईझीन फालेरो यांच्या राजीनाम्याची अफवाच

भाजपने त्यांना वेळ्ळी मतदारसंघातून उमेदवारी नाकारली होती. त्यामुळे ते काही दिवसांपासून नाराज होते. आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करताच पक्षाने नेरी यांना वेळ्ळी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली. आता नेरी याच्या विरूद्ध भाजपने पत्रकार सॅविओ रॉड्रिग्ज यांना या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. जुलै 2019मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये दाखल झालेल्या 10 आमदारांपैकी एक फिलिप नेरी होते. दोन दिवसांपूर्वीच माजी मंत्री फ्रान्सिस्को मिक्की पाचेको पक्षीत घरवापसी कली आणि आज नेरी यांच्या प्रवेशाने गोव्यात राष्ट्रवादी पक्षाची ताकद वाढली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com