फातोर्ड्यात दामू आणि विजय पुन्हा आमनेसामने

कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल, एकमेकांवर खरमरीत टीका
Vijay Sardesai and Damu Naik filed Nominations for Goa Elections
Vijay Sardesai and Damu Naik filed Nominations for Goa ElectionsDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव : फातोर्डा मतदारसंघात भाजपचे दामू नाईक आणि गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई हे चौथ्यांदा निवडणुकीत आमने सामने येत असून आज दोघांनीही आपआपले उमेदवारी अर्ज आपल्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भरले. (Goa Elections News Updates)

Vijay Sardesai and Damu Naik filed Nominations for Goa Elections
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर दिगंबर-बाबूमध्ये जुंपली

आज उमेदवारी अर्ज भरणाऱ्यांमध्ये विजय सरदेसाई (Vijay Sardesai) पाहिले होते. त्यांनी उमेदवारी अर्ज भरून आजच्या दिवसाचे खाते खोलले. यावेळी पत्रकारांशी बोलताना सरदेसाई यांनी फातोर्ड्यात आपण जी विकासकामे केली आहेत त्या जोरावर आपण सहज जिंकू असा विश्वास व्यक्त केला.

मात्र ते पुढे म्हणाले, या निवडणुकीत मी हेट्रिक केली याहीपेक्षा हे लोकविरोधी भाजप सरकार कसे घरी बसेल हे पाहणे महत्वाचे असून काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्डची युती निश्चितच हे काम करेल असा विश्वास व्यक्त केला.

Vijay Sardesai and Damu Naik filed Nominations for Goa Elections
कोणाच्याही दबावाला बळी पडणार नाही : पार्सेकर

दुसरीकडे दामू नाईक (Damu Naik) यांनी विजय सरदेसाई यांच्यावर टीका करताना, मागच्या 10 वर्षात फातोर्ड्यात जो विकास झाला असा दावा केला जातो तो केवळ दिखाऊ विकास असून या आमदाराने मतदारसंघात केवळ गुंडगिरीचा कारभार केला, असा आरोप केला. लोकांमध्ये आमदारासाठी चीड असून आपण जेव्हा प्रचार करण्यासाठी जातो तेव्हा ती निश्चित दिसून येते, असे ते म्हणाले. आज आपचे संदेश तेलेकर यांनीही फातोर्डातून उमेदवारी अर्ज भरला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com