मनोहर पर्रीकरांची उणीव भरुन निघू शकत नाही, मात्र... : गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं
Nitin Gadkari
Nitin GadkariDainik Gomantak

दिल्ली : गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन निघू शकत नाही, मात्र विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची कामही वाखाणण्याजोगी आहे. पर्रीकरांनी दाखवलेल्या मार्गावरच गोव्याच्या विकासासाठी प्रमोद सावंत कार्यरत असल्याचं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी गोव्यातील भाजप सरकारचं कौतुक केलं आहे. पर्रीकरांच्या मार्गदर्शनामुळे गोव्यात प्रमोद सावंतांनी मोठं यश मिळवलं आहे आणि आपल्याला त्याचा आनंदच आहे, अशा शब्दात गडकरींनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. (Nitin Gadkari News Updates)

Nitin Gadkari
भाजपने कधीच जाती-धर्माचे राजकारण केले नाही: जे. पी.नड्डा

गोव्यासह विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या पाच राज्यात भाजपचंच (BJP) सरकार येणार. पंजाब वगळता इतर राज्यात भाजपचं सरकार पुन्हा येणार आहे आणि पंजाबमध्येही भाजपचं सरकार बहुमताने निवडून येईल असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे. पंजाबमध्ये पहिल्यांदाच भाजप मोठ्या संख्येने आणि ताकदीनिशी लढतो आहोत, असंही गडकरींनी स्पष्ट केलं.

राहुल गांधी (Rahul Gandhi) विरोधक असल्यामुळे आरोप करतात. मात्र आम्ही आमचं परराष्ट्र धोरण योग्य आहे आणि ते यशस्वीही ठरताना दिसतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच भारत आपली वेगळी ओळख बनवत आहे. मात्र राहुल गांधी हे कधीही मान्य करणार नाहीत, कारण त्यांना विरोधी राजकारण करायचं आहे, असा निशाणा नितीन गडकरींनी साधला.

Nitin Gadkari
'साखळीत काँग्रेस मुख्यमंत्र्यांचा पराभव करणार' : अशोक चव्हाण

यूपीतील योगी आदित्यनाथ एक यशस्वी मुख्यमंत्री (CM) आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी योगी आदित्यनाथांनी अभूतपूर्व काम केलं आहे. त्यांनी यूपीतील गुंडाराज संपवलं आहे. यूपीत आता विकास दिसतो आहे. योगींनी आरोग्य, शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव काम केलं आहे, तसंच बेरोजगारी कमी करण्यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत, असंही गडकरी म्हणाले. यूपीतील रस्ते पुढील पाच वर्षात अमेरिकेच्या तोडीचे बनवणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. विमानतळं, जलसिंचन याच्या माध्यमातून यूपी प्रगतीपथावर जात असून याचं श्रेय तिथे सत्तेत असलेल्या भाजप सरकार आणि योगी आदित्यनाथ यांना जातं, असंही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com