...तर कडक कारवाई करणार, सीईओंचा इशारा

टपाल मते दबावतंत्राची निवडणूक आयोगाच्या सीईओंकडून गंभीर दखल
Goa Election Commission
Goa Election CommissionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय पक्षाच्या उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमार्फत टपाली मतांसाठी कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात असल्याची चर्चा आहे. तशा तक्रारी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे नोंद झाल्या आहेत. त्याची दखल घेत गोव्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी जिल्हा निर्वाचन अधिकारी आणि पोलिस महासंचालकांकडून यासंदर्भात चौकशी करुन तीन दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.

मतदानाच्या दिवशी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या टपाली मतांसाठी राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्याकडून आमिष दाखवण्याचे किंवा मतदार काही मागणी करत असल्याचे प्रकार उघडकीस आल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या नोटीशीद्वारे दिला आहे. (Goa Election Commission News Updates)

Goa Election Commission
म्हापसा जिल्हा रुग्णालयाचे सांडपाणी रस्त्यावरच; रुग्णांच्या आरोग्याशी खेळ

काही राजकीय पक्षांच्या व्यक्ती टपाल मतांसाठी संबंधित मतदारांकडे संपर्क साधून त्यांची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यात एखाद्या उमेदवाराची व्यक्ती आढळून आल्यास लोकप्रतिनिधी कायदा आणि भादंसंच्या 171 ब व 171 कलमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई करण्यात येईल. तसेच टपाली मतांसाठी जर एखादा मतदार काही मागणी करत असल्यास त्याच्याविरुद्धही कायदेशीर त्याच्या खात्यांतर्गत कारवाई होऊ शकते. असे प्रकार आढळून आल्यास मतदारांनी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे नोटिशीत म्हटले आहे.

Goa Election Commission
गोव्यात भाजप पुन्हा सरकार स्थापन करेल?

गेल्या 14 फेब्रुवाराली राज्यात मतदान झाल्यानंतर त्या दिवशी ड्युटीवर असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना टपाल मतपत्रिका देऊन त्या येत्या 8 मार्चपर्यंत मत नोंदवून संबंधित निर्वाचन अधिकाऱ्यांकडे टपालाने किंवा व्यक्तिशः देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. काही मतदारसंघात अटीतटीच्या लढती झाल्या असल्याने टपाली मते हे निर्णायक ठरु शकतात. निवडणूक कार्यालयातर्फे 15,716 टपाल मतपत्रिका (पोस्टल बॅलट) कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सरासरी सुमारे 400 टपाल मते प्रत्येक मतदारसंघात आहेत. मागील निवडणुकीत काही उमेदवार 500 पेक्षा कमी मताने पराभूत झालेले आहेत. त्यामुळे ही मते महत्वाची असल्याने काही राजकीय पक्षांकडून या मतदारांना (Voters) आमिष दाखवण्याचे तसेच दबाव आणून मते घेण्याचे प्रकार सुरू झाले आहेत.

Goa Election Commission
व्हेरेग बेटाजवळील समुद्रात शिंपल्याचे पिक

काँग्रेसने (Congress) या टपाली मतांसाठी मतदारांवर दबाव आणला जात असल्याची तक्रार मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केली आहे. हे दबावतंत्र अधिक तर पोलिस खात्यातील कर्मचाऱ्यांवर आणले जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. खात्यातील निवडणूक कक्षाचा उपनिरीक्षक काही पोलिस कर्मचाऱ्यांना आमिष दाखवण्याबरोबरच भाजपलाच मते देण्यासाठी दबाव टाकत असल्याची तक्रार दाखल केली आहे आणि त्वरित त्याला निलंबित करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे.

पर्ये, वाळपई, मडगाव, मडकई आणि कळंगुट हे मतदारसंघ वगळता इतर मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयाबाबत कोणीच खात्री देऊ शकत नाही. ही लढत काँग्रेस आणि भाजप (BJP) या दोन राष्ट्रीय राजकीय पक्षांमध्ये झाली असली तरी इतर राजकीय पक्षांचे उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. त्यामुळे मतांची विभागणी ही काँग्रेस वा भाजपला अडचणीत आणू शकते. त्यामुळे टपाली मते मिळवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com