व्हेरेग बेटाजवळील समुद्रात शिंपल्याचे पिक

जैवविविधताप्रेमी सुखावले: प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
Tisare
TisareDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: दाबोळी येथील व्हेरेग बेटावर तिसऱ्यांचे (शिंपले) बऱ्याच दिवसांनंतर दर्शन झाल्याने चिखलीवासीय व जैवविविधताप्रेमी सुखावले. मात्र, या लहान आकाराचे तिसरे गोळा करण्यासाठी काही लोक तेथे गर्दी करू लागल्याने चिखलीवासीय चिंतेत आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा तिसरे दिसतील की नाही ही भीती चिखलीवासीयांना सतावत आहे. यासाठी अटकाव करण्याची गरज आहे. स्थानिक अधिकारी व गोवा (Goa) जैवविविधता प्रशासनाने (Biodiversity Management Committee) याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. (Mussels crop in sea near Verge Island)

Tisare
म्हापसा इस्पितळाचे सांडपाणी रस्त्यावर!

या व्हेरेग बेटावर मोठ्या प्रमाणात तिसरे मिळत होते. येथील तिसरे विकून काहीजण आपला उदरनिर्वाह करतात. तिसरे काढतानाही ते मोठ्या प्रमाणात आहेत की नाही याचीही त्यांच्याकडून काळजी घेतली जाते. तिसऱ्यांचे प्रजनन व्हावे, यासाठी संबंधित योग्य ती खबरदारी घेत होते, परंतु मध्यंतरी तिसरे मिळण्याचे प्रमाण अतिशय कमी झाल्याने चिखलीवासीय व आसपासचे रहिवासी चिंतेत होते. मात्र, गेल्या महिन्यामध्ये येथे तिसऱ्यांचे दर्शन झाल्याने स्थानिक सुखावले होते. पूर्णपणे मोठे न झालेले तिसरे गोळा करण्यात येत नाहीत. परप्रांतीयांनी तेथील तिसरे गोळा करून नेले होते.

...तर उत्पत्ती धोक्यात

शनिवारी पुन्हा तेथे तिसरे गोळा करण्यासाठी काही परप्रांतीयांची गर्दी झाली होती. सरसकट तिसरे गोळा करून नेल्यामुळे येथील तिसऱ्यांची उत्पत्ती धोक्यात येऊ शकते. पुढे या ठिकाणी पुन्हा तिसरे मिळणार की नाही, याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com