साखळीत मुख्यमंत्री सावंतांना काँग्रेस डोईजड

साखळीच्या ग्रामीण भागातील मतदारांचाही काँग्रेसच्या बाजूने कल
Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight
Dharmesh Saglani and Pramod Sawant Political FightDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : गोव्यात यंदा झालेलं विक्रमी मतदान हे प्रस्थापितविरोधी मतदान ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिग्गज नेत्यांचं धाबं दणाणल्याचं चित्र निर्माण झालं आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही याला अपवाद नाहीत. गोव्यात सर्वाधिक मतदान मुख्यमंत्र्यांच्या साखळी मतदारसंघात झाल्याने मुख्यमंत्र्यांसमोरही तगडं आव्हान उभं ठाकलं आहे. (Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight News Updates)

Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight
Goa Election 2022: मडगावात कोण जिंकणार बाबा की बाबू?

मुख्यमंत्री प्रमोद सावंतांच्या (Pramod Sawant) मतदारसंघात काँग्रेसने धर्मेश सगलानी यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. काँग्रसने मुख्यमंत्र्यांनी चितपट करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. इतकंच नाही तर खुद्द राहुल गांधींनी सगलानींच्या प्रचारार्थ साखळीत सभाही घेतली. साहजिकच भाजपकडूनही सूत्र हलली आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्र्यांसाठी प्रचारसभा घेतली. असं असलं तरीही धर्मेश सगलानींचं पारडं अजूनही जडच असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. काँग्रेसने आपला जाहीरनामाही साखळीमध्येच जाहीर केला. राहुल गांधींनी जाहीरनामा प्रसिद्ध केल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघातूनच भाजपवर थेट निशाणा साधला होता.

याआधीही मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचं शहरी भागात प्राबल्य नव्हतं. ग्रामीण भागात प्रमोद सावंतांची व्होट बँक होती. मात्र यावेळी ग्रामीण भागातही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कल दिसून आला आहे. मतदारांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात कौल दिल्याचं जाणकारांचं निरीक्षण आहे. मागच्या वेळेस दिलेली आश्वासनं पूर्ण करण्यात मुख्यमंत्र्यांना आलेलं अपयश हे या विरोधास कारण असल्याचं बोललं जात आहे. साखळी परिसरात नोकरीचा प्रश्नही ऐरणीवर होता, मुख्यमंत्र्यांना तो सोडवण्यातही अपयश आल्याने तरुणांमध्येही नाराजी आहे. रिव्हॉल्यूशनरी गोवन्सने हाच प्रश्न उचलून धरला आणि सरकारविरोधात आवाज उठवला. मात्र आरजीला म्हणावं तसं यश आल्याचं चित्र नाही. त्यामुळे खरी लढत ही मुख्यमंत्री प्रमोद सावंत विरुद्ध धर्मेश सगलानी अशी पाहायला मिळणार आहे.

Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight
उत्पल पर्रीकरांना केवळ वडिलांच्या वारशाचा आधार!

मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मतदार जाण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे विश्वजीत राणेंचा छुपा प्रचार. काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये आलेल्या विश्वजीत राणेंची राजकीय महत्त्वाकांक्षा आजपर्यंत काही लपून राहिलेली नाही. राजकीय सूत्रांच्या मते विश्वजीत राणेंनी साखळीत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात प्रचार केला. याचा मोठा फटका मुख्यमंत्र्यांना बसू शकतो. विश्वजीत राणेंनी याआधीही आपली नाराजी पक्षश्रेष्टींकडे बोलून दाखवली आहे. अनेकदा त्यांनी केंद्रातील नेत्यांच्या भेटी घेतल्याचंही वेळोवेळी दिसून आलं आहे. याच राजकीय असूयेतून विश्वजीत यांनी मुख्यमंत्र्यांविरोधात प्रचार केल्याचं बोललं जात आहे. राणेंचं साखळी भागात असलेलं प्राबल्य मुख्यमंत्र्यांसाठी मोठं आव्हान ठरु शकतं.

काँग्रेसचा इतिहास आहे की त्यांच्या मतांची टक्केवारी 28 टक्क्यांपेक्षा खाली जात नाही. त्यातच साखळीसारख्या भागात अजूनही भाजपची पाळंमुळे नीट रुजलेली नाहीत. काँग्रेसने याचाच फायदा घेत आपलं लक्ष या भागावर केंद्रित केलं आणि मुख्यमंत्र्यांविरोधात प्रचार केला. त्यातच भर म्हणून मगोपकडून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महादेव खांडेकर यांनी भाजपची मतं खाल्ल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे, ज्याचा थेट फटका मुख्यमंत्री प्रमोद सावंतांना बसण्याची शक्यता आहे. गोव्यात सर्वाधिक मतदान साखळीत झाल्याचा फटका भाजपलाच बसण्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केला आहे. कारण गोव्यात यंदा मोठ्या प्रमाणात झालेलं मतदान हे प्रस्थापितविरोधी मतदान असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. दरम्यान गोव्यातील विधानसभा निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या सूकाणू समितीची विशेष बैठकही आयोजित करण्यात आली आहे.

Dharmesh Saglani and Pramod Sawant Political Fight
Goa Election 2022: काँग्रेस आणि भाजपा कार्यकर्त्यांकडून फटाक्यांचे बार

काँग्रेस कार्यकर्ते सर्वाधिक सक्रीय

साखळीत काँग्रेस कार्यकर्ते प्रचारात सर्वाधिक सक्रीय कार्यकर्ते होते, असं निरीक्षण नोंदवण्यात आलं आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घरोघरी जात भाजपच्या चुकीच्या धोरणांचा प्रचार (Election Campaign) केला. तसंच मुख्यमंत्र्यांविरोधात प्रचार केल्याचा फटकाही भाजपला बसणार आहे. मुख्यमंत्र्यांचं प्राबल्य असलेल्या ग्रामीण भागाला लक्ष्य करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी दारोदार प्रचार केला. साहजिकच ग्रामीण भागातील मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यात कार्यकर्ते यशस्वी झाल्याचं बोललं जात आहे.

साखळीत सर्वाधिक मतदानाचा भाजपाच फायदा : तानावडे

दरम्यान साखळीत झालेल्या सर्वाधिक मतदानाचा फायदा हा भाजपलाच होणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केला आहे. साखळीत मतदारांनी भाजपलाच कौल दिला असून भाजपच्या 22 हून अधिक जागा निवडून येतील असा विश्वास तानावडेंनी व्यक्त केला आहे. भाजप तिसऱ्यांदा गोव्यात सत्ता स्थापन करणार असल्याच्या वक्तव्यावर आपण आताही ठाम असल्याचं तानावडेंनी स्पष्ट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com