Goa Election 2022: मडगावात कोण जिंकणार बाबा की बाबू?

दिगंबर कामत आणि बाबू आजगावकर आमनेसामने आल्यावर मडगावातील लोकांना ‘हाय-प्रोफाईल’ ड्रामा पाहायला मिळाला
Babu Ajgaonkar and Digambar Kamat
Babu Ajgaonkar and Digambar Kamat Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: पणजीनंतर ज्या लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे, त्या मडगावात आज वातावरण एकदम गरम झाल्याचे लोकांना अनुभवायला आले. ही निवडणूक मडगावकरांचा लाडका बाबा परत एकदा जिंकणार, की पेडणेहून मडगावात आणलेला बाबू, हाच प्रश्न मडगावकर एकमेकांना विचारताना दिसत होते.

Babu Ajgaonkar and Digambar Kamat
Goa Election 2022: कळंगुट, शिवोली मतदारसंघात 80 टक्क्यांहून अधिक मतदान

मोती डोंगर परिसरात आज दिगंबर कामत आणि बाबू आजगावकर आमनेसामने आल्यावर तिथे लोकांना हाय प्रोफाईल ड्रामाही पाहायला मिळाला. आज सकाळी ही ठिणगी पडली. दिगंबर कामत हे मोती डोंगरावरील बुथची पाहणी करण्यास गेले असता तिथे त्यांना त्यांच्या समर्थकांनी गराडा घातला. त्याचवेळी बाबू आजगावकर (Babu Azgavkar) तिथे पोहोचले. त्यांनी या प्रकाराला आक्षेप घेतल्याने वाद निर्माण झाला. यावेळी आजगावकर यांनी कामत यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. त्यामुळेच वातावरण तापले. दिगंबर कामत गुंडांना संरक्षण देतात, असा आरोप आजगावकरांनी केला.

Babu Ajgaonkar and Digambar Kamat
Goa Election 2022: केपेत 80 टक्के मतदान कुणाचे?

भाई नायक यांनी त्यानंतर पत्रकारांना सांगितले, की आजगावकर यांनी पोलिसी बळाचा वापर करून कामत यांच्या कार्यकर्त्यांवर दबाव आणल्याने तणाव निर्माण झाला. फक्त मोती डोंगरच नव्हे, तर खारेबांध, आके, मालभाट या परिसरातही बाबा आणि बाबू यांच्या कार्यकर्त्यांत अशीच चढाओढ चाललेली दिसून आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com